शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
2
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
3
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
4
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी
5
शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...
6
मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त
7
ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर
8
विशेष लेख: ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का..?
9
संकटकाळी ज्यांना मदत, त्यांनीच फाेडला पक्ष; शरद पवारांचा परळीतून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
10
मुंबईत प्रचाराच्या तोफा अद्याप थंडावलेल्याच; शेवटच्या आठवड्यात मात्र प्रचाराचा पारा चढणार!
11
दोन वर्षांच्या बालिकेची अत्याचार करून हत्या; विकृत सावत्र बापाचे निर्घृण कृत्य
12
हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ
13
मोठा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विनोद पाटील यांची भेट; चर्चांना उधाण
14
एक बातमी अन् शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड, 2 दिवसात 44% ची तेजी
15
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
16
महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!
17
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली
18
“UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे
19
वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका
20
"पृथ्वीवर यांच्यासारखा पक्ष नसेल"; जयंत पाटलांच्या टीकेवर तटकरे म्हणाले, "तुमचा करेक्ट कार्यक्रम..."

सातिवली स्मशानभूमीतील शौचालयाचे काम रोखले

By admin | Published: January 11, 2017 6:02 AM

सातिवली स्मशानभूमीतील महापालिकेकडून सुरु असलेल्या शौचालयाच्या कामास भाजपा, शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व ग्रामस्थांनी

पारोळ : सातिवली स्मशानभूमीतील महापालिकेकडून सुरु असलेल्या शौचालयाच्या कामास भाजपा, शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर ते काम बंद करण्याचे महापालिका आयुक्तांनी आश्वासन दिले आहे. संघटना संतप्त असल्याने वालिव पोलिसांनी यशस्वी मध्यस्थीकरुन या प्रसंगातून मार्ग काढला.महानगरपालिकेच्या प्रभाग जी वॉर्ड क्र. ७५च्या हद्दीतील वसई पूर्वेच्या महामार्गालगत असलेल्या सातिवली गावातील समशानभूमीच्या आवारात बी.ओ.टी. (बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा) तत्वावर सुलभ शौचालयाचे काम सुरु होते. त्यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले होते. मेल्यानंतर तरी घाण व दुर्गंधीपासून मुक्ती द्या, असा सूर येथे उमटत होता. तसेच हिंदूंचीच स्मशानभूमी तुम्हाला शौचालय बांधायला मिळाली का? असा सवाल धार्मिक संघटनांनी उपस्थित केला होता.याबाबत शिवसेनेचे दत्ताभाऊ कुळे, भाजपाचे विश्वांभर चोपडेकर व ग्रामस्थांनी वेळोवेळी हरकत घेऊन तक्र ार दिली होती. मात्र, तरीही काम सुरूच होते. त्यामुळे त्यांनी भाजपाचे जिल्हा सचिव राजेंद्र म्हात्रे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यांनी स्मशानभूमीची पाहणी करून ग्रामस्थ, शिवसेना , विश्वहिंदू परिषद, बजरंग दलच्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी शांततेत जमलेल्या शेकडो लोकांच्या सहभागातून एक शिष्टमंडळ वालिव पोलीस ठाण्याचे अधिकारी महेश पाटील यांना भेटले व त्यांना परिस्थितीची जाणिव करून दिली. (वार्ताहर)पोलिसांनी केली यशस्वी मध्यस्थीच्पोलिसांनी पाहणी करून शिष्टमंडळास पालिका आयुक्त लोखंडे यांची भेट घेण्यास सांगितले. ते याबाबत निर्णय देई पर्यंत शौचालयाचे काम सुरु न करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. च्याबाबत आयुक्तांच्या भेटीत शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन चालू असलेल्या शौचालयाचे काम त्वरीत थांबवून त्या ऐवजी बाजूस असलेले जुने शौचालय नव्याने बांधून देण्यात येणार असून व स्मशानभूमीचेही सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. च्त्यामुळे या परिसरातील मोठा तणाव अप्रिय घटना घडण्यापूर्वीच टाळण्यात पोलीस व महापालिका आयुक्त यशस्वी झाले.