पालघर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल 83.05 टक्के लागला असून मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारी 7.1 टक्के जास्त आहे. सर्वाधिक निकला वसईचा ८४.५० आहे तर सर्वात कमी निकाल विक्रमगडचा ७०.६० टक्के आहे.जिल्ह्यातून ४२ हजार ०३५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात २२ हजार ९५७ मुले तर १९ हजार ०७८ मुलींचा समावेश होता. त्यापैकी एकुण ३४ हजार ९१२ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यात 18 हजार 337 मुले तर 16 हजार 575 मुलींचा समावेश आहे. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 79.88 टक्के असून मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 86.88 टक्के इतकी आहे.>असा आहे तालुका निहाय निकलावाडा तालुक्यात 2 हजार 085 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 1 हजार 024 मुले तर 1हजार 061 मुली आहेत.एकूण निकाल 75.52 टक्के लागला.मोखाडा तालुक्यातून एकूण 1 हजार 133 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी 563 मुले तर 378 मुली असे एकूण 941 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण टक्केवारी 83.05 टक्के अशी आहे.विक्र मगड तालुक्यातून एकूण 1823 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातून 715 मुले तर 572 मुली असे एकूण 1287 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा निकाल 70.60 टक्के लागला.जव्हार तालुक्यातून एकूण 1हजार 244 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल 72.19 टक्के इतका लागला आहे.तलासरी तालुक्यात एकूण 1हजार 444 मुले तर 1हजार 252 मुली असे एकूण 2हजार 696 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 1 हजार 117 मुले तर 1हजार 063 मुली असे एकूण 2 हजार 180 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल 80.86 टक्के इतका निकाल लागला आहे.डहाणू तालुक्यातून एकूण 2 हजार 537 मुले तर 2 हजार 088 मुली असे एकूण 4 हजार 625 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 1हजार 956 मुली तर 1 हजार 798 मुली असे एकूण 3 हजार 754 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल 81.17 टक्के लागला.पालघर तालुक्यातून एकूण 5 हजार 324 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 4 हजार 182 उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल 78.55 टक्के लागला.वसई तालुक्यातून एकूण 22हजार 429 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 10 हजार 427 मुले तर 9 हजार158 मुली अशा एकूण 19 हजार 585 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तालुक्याचा एकूण निकाल 84.50 टक्के इतका लागला.
जिल्ह्याचा निकाल ८३ %, मुलींनी मारली सर्वत्र बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 1:10 AM