शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

रेतीमाफियांच्या दगडफेकी पुढे महसूल प्रशासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 1:32 AM

वसई तालुक्यातील नारिंगी (ज्युली) ग्रामस्थांनी येथील रेती माफियांविरोधात न्यायालयीन लढाईमध्ये यश मिळवले

अजय महाडीकमुंबई : वसई तालुक्यातील नारिंगी (ज्युली) ग्रामस्थांनी येथील रेती माफियांविरोधात न्यायालयीन लढाईमध्ये यश मिळवले असले तरी प्रतिबंधात्मक कारवाई करतांना महसूल, पोलीस, मेरिटाईम आणि रेल्वे प्रशासनाकडून हात आखडता घेतला जात आहे. प्रत्यक्ष कारवाई सुरु असतांना माफियांंकडून होणारा धारदार कातळाच्या दगड गोट्यांचा मारा त्यांच्या उरात धडकी भरवत आहे. आतापर्यंत अनेक जण या कारवाईमध्ये जखमी झाल्याचे नारिंगी येथील ग्रामस्थ तसेच नायब तहसीलदार स्मिता गुरव यांनी स्पष्ट केले आहे.ज्युली खारभूमी विकास मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण पाटील यांनी बेटावरील भात शेतीच्या व कांदळवनाच्या रक्षणासाठी वर्ष २०१४ पासून प्रखर भूमिका घेऊन न्यायालयीन लढाई सुरु केली आहे. आज त्यांच्या पाठीशी गावातील १५२ कुटुंबे ठामपणे उभे आहेत. चार महिन्यांपूर्वी टेंबीखोडावे येथे महसूल विभागाच्या कारवाईच्या वेळी तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि पंधरा तलाठी यांच्या पथकाने कारवाई केली होती. यावेळी झालेल्या दगड गोट्यांच्या माऱ्यात हरेश म्हात्रे, किशोर पाटील, विजय पाटील व तलाठी बांगर जखमी झाले होते. या प्रकरणी केळवा सागरी पोलीस ठाण्यात ४५ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वैतरणा, कसराळी, शिरगाव, खार्डी, डोलीव व टेंबी गोडावे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सक्शन पंपाद्वारे रेतीचे उत्खनन होते. एका सक्शन पंपाद्वारे दहा मिनिटात एक बोट रेती (सहा ब्रास) चे उत्खनन होते. असे शंभर ते दीडशे सक्शनपंप लावून रेती काढली जाते. विशेष म्हणजे नारिंगे वगळता कोणत्याही रेती बंदरातील बोटींना रेती उत्खननासाठी बंदर विभागाची परवानगी नाही. दरम्यान, पोलीस सरक्षण असतांना सुद्धा हे हल्ले होत असल्याने खारभूमीच्या रक्षणासाठी उभे ठाकलेले गावकरी भयभीत झाले आहेत.उत्खननाला विरोध करणाºया गावकºयांना माफियांकडून धमक्यागावकºयांना माफियांकडून धमक्या दिल्या जात आहेत. रात्री अपरात्री दगडांचा मारा होतो. तरीही या माफियांच्या विरोधात नांिरंगीचे गावकरी कंबर कसून उभे आहेत. पोलीस तक्रार घेत नाहीत, उलट सुलट प्रश्न विचारुन कायद्याचे ज्ञान नसणाºया गावकºयांच्या अंगावर ओरडतात. महसूल विभागाकडून दोन चार महिन्याने थातूर-मातूर कारवाई केली जाते आणि पुन्हा सक्शन पंप सुरु होतात. तक्रारींच्या रेट्यामुळे ७ जून २०१८ रोजी नायब तहसीलदार दिपक गायकवाड, सर्कल आॅफिसर सोनावणे, नारिंगे तलाठी अक्षदा गायकर, मेरिटाईम विभागाचे बंदर निरिक्षक सुशिल पाटणकर व खार भूमी विभागाच्या गीता गायकवाड यांनी पहाणी केली असून त्या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांना सुपुर्द केला असल्याचे पाटणकर यांनी सांगितले.२०१२ मध्ये वैतरणा रेल्वे पुलाला धोका निर्माण झाला असल्याचे लक्षात आल्यावर २० ते २२ दिवस रेल्वे गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली होती. उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही या पुला खाली उत्खनन सुरु असल्याची तक्रार जुली खारभूमी लाभार्थी सहकारी संस्था, नारिंगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यापूर्वी तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित बांगर यांनी शिरगाव, कसराळी, वैतरणा पूर्व व पश्चिम, खार्डी, तानसा, व टेबी खोडावे या लॅडिंग पॉर्इंटवर वारंवार कारवाई करुन रेती माफियांचे कंबरडे मोडले होते.