डहाणू/बोर्डी : अरबी समुद्रात दोन चक्र ीवादळ घोंगावत असताना शुक्र वारी रात्री नऊनंतर मुसळधार पावसाने खाचरात कापून ठेवलेल्या भातपिकाची नासाडी झाली आहे. शुक्र वारी रात्री डहाणू तालुक्यातील चिंचणीपासून ते बोर्डीपर्यंतच्या किनारी भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला. शिवाय शहरासह डोंगरी पट्ट्यालाही पावसाने झोडपून काढले.
हळव्या भातपिकाचे नुकसान झाले असताना, दोन दिवस ऊन पडल्यामुळे बळीराजाने गरवे आणि निमगरव्या भाताची कापणी सुरू केली होती. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कापलेले भात खाचरातील पाण्यात तरंगू लागले होते. ते चिखलातून काढताना शेतकरी कुटुंबाची दमछाक झाली. आर्थिक नुकसानीपेक्षाही पिकाची नासाडी झाल्याने शेतकरी मानसिकरित्या खचला आहे.पालघर जिल्ह्यातील भातपिक क्षेत्र ७६ हजार ५०० हेक्टर असून त्यातील ९३ टक्के लागवड झाली आहे. म्हणजे ७१ हजार ३०८ हेक्टर क्षेत्र आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. भात कापल्यावर काही दिवस रिमझिम पाऊस होता. त्यामुळे आर्द्रतेचे वातावरण निर्माण झाले आणि भातशेतातील कडपावर रुजलं. थोडा फार हळवे जातीचे भात कापून घरी नेल्यामुळे काहीना आधार आहे. परंतु शेतातील भात दोन, तीन उन्हे दिली तरी मिळालेल्या भातापासून मिळणारा तांदूळ हा खराब प्रतीचा व मोड झालेला असेल. कृषी विभाग आपल्या त्रिस्तरीय समिती (तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक) मार्फत नुकसानीचे पंचनामे करीत आहे. तसेच विमाधारक शेतकऱ्यांचे विमा प्रतिनिधीमार्फत पंचनामे सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मिळणारा पेंढाही गुरे खाणार नाही.दरम्यान, मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकाºयांनी पीक नुकसानीचा पंचनामा सुरू केला आहे. आजही अनेक गावांमध्ये हे कर्मचारी न पोहचल्याने शेतकºयांमधील संताप वाढताना दिसला. या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे शेती आणि पूरक व्यवसाय तसेच स्थानिक व्यवसाय डबघाईला येणार आहेत.