- मंगेश कराळेनालासोपारा : शहरातील रिक्षावाले मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन करत असून रिक्षातून ३ प्रवासी नेण्याचा नियम असतानाही ४ ते ५ प्रवासी नेतात. वाहतूक पोलिसांचेही या गोष्टीकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे. त्यामुळे नियमापेक्षा जास्त प्रवासी नेणाºया रिक्षाचालकांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. याबाबत तातडीने काही ना काही कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.नालासोपारा पश्चिमेकडील तसेच पूर्वेकडील पुलाखाली मोठ्या प्रमाणात रिक्षा उभ्या असल्याने नागरिकांना तसेच वाहतुकीला मोठा त्रास होतो. वास्तविक, येथे वाहतूक पोलिसाची गरज असतानाही कोणीही पोलीस नसतो. त्यामुळेच रात्रीच्या वेळी बॅच, परमिट नसलेल्या अनिधकृत रिक्षांचा मोठ्या प्रमाणात वावर येथे दिसतो.नालासोपारा पूर्वेकडे पुलाखाली अनधिकृत रिक्षाचालकांचा सुळसुळाट असून रिक्षा बिनधास्त रस्त्यावर आडव्या, उभ्या करून कोंडी करत असतात. यामुळे नागरिकांना चालण्यास त्रास होत आहे. तर नालासोपारा पश्चिमेकडील एसटी डेपो, हनुमान नगर, छेडा नगर, शांती पार्क, श्री प्रस्था येथे जाणाºया प्रवाशांना हे रिक्षावाले रात्रीच्या वेळी मजबुरीचा गैरफायदा घेत अक्षरश: लुटतात. पूर्वेकडील रिक्षावालेही प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेतात. या रिक्षावाल्यांवर वाहतूक पोलिसांचा वचक नसल्याने त्यांचे फावते आहे. काही रिक्षावाले अनधिकृत आहेत. त्यांच्याकडे परवाना, परमिट, आदी पूरक कागदपत्रे नसूनही ते शहरात रिक्षा चालवतात.रात्रीच्या वेळी वाहतूक पोलीस नसल्याचा गैरफायदा घेऊन महिला प्रवाशांकडून हे रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा पैसे घेतात.मनीषा वाडकर, महिला प्रवासीअनधिकृत आणि बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली असून ती दररोज सुरू आहे. लवकरच मोठी मोहीम हाती घेऊन या रिक्षांवर कारवाई करून त्या जप्त करण्यात येतील- विलास सुपे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, वसई
नालासोपाऱ्यात रिक्षावाल्यांची दादागिरी; पाच प्रवाशांची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 2:34 AM