- हितेन नाईकपालघर - पालघरच्या पाटकर गल्लीतील (रामकृष्ण नगर) मागील दीड मिहन्यांपासून रखडलेला रस्ता एका रात्रीत उभारण्याची किमया सेनेच्या एका वरिष्ठ नेत्यांने युद्धपातळीवर केल्याने तेथील रहिवाश्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.पालघर पाटकर गल्ली ते भाजी मार्केट रस्त्याचा ठेका १८ लाखाला देण्यात आला असून नगरपरिषदेकडून नळाच्या पाईपलाईनचे काम करण्यात येत नसल्यामुळे मागील दीडमहिन्यांपासून या रस्त्याचे काम अपूर्णवस्थेत पडून होते. या बाबत रामकृष्णनगर मधील रहिवाशांनी नगरपरिषदेकडे अनेक तक्र ारी केल्या होत्या. या बाबत रहिवाशांनी ठेकेदाराकडे विचारणा केली असता नगरपरिषदेकडून पाईपलाईनचे काम हाती घेतले जात नसल्याने रस्त्याचे काम सुरू करता येत नसल्याचे ठेकेदाराने त्यांना सांगितले. नगरपरिषद आणि ठेकेदारच्या वादामुळे या भागातील रस्ते खोडून दगड, खडी, सीमेंट कोंक्र ीटचे ढीग पडून गटाराचे सांड पाणी साचले आहे. सदर रस्त्याच्या कामाचा ठेका एका बंडखोर शिवसेना अपक्ष उमेदवाराशी संबंधित असल्याचे कळल्यानंतर सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने तत्काळ रामकृष्णनगर मधील नागरिकाशी संपर्क साधला. नगरपरिषद प्रशासनाला रात्रीच घटनास्थळी बोलावून त्यांनी संबंधित ठेकेदार काम पूर्ण करीत नसल्यास त्याच्यावर कारवाईचे आदेश दिले. ठेकेदाराने घटनास्थळी येत नळ पाणीपुरवठ्याचे काम अपूर्ण असल्याने रस्त्याचे काम हाती घेता येत नसल्याचे सांगितले. त्यावर सेना नेत्याने कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.शिवसेनेची पंधरा वर्ष सत्ता असलेल्या पालघर नगरपरिषदेत अनेक विकास कामे आजही अपूर्णावस्थेत्त पडून असून त्याच्याकडे मात्र अद्यापही लक्ष दिले गेलेले नाही. बाळासाहेबांच्या नावाने उभारण्यात आलेल्या उद्यानाची हजारो रु पयांचे विद्युत वितरण विभागाचे बील वेळीच भरण्यात आलेले नसल्याने हे उद्यान अनेक महीने अंधारात होते.इतर कामांचे काय?मतांचे गणित डोळ्यांसमोर ठेवून हे काम तात्काळ करण्यात आले असले तरी अशी सजगता शहरातील अन्य अपूर्ण कामे पूर्ण करण्याकरिता का दाखवली गेली नाही असा सवाल आहे.
एका रात्रीत बांधला रस्ता, आचारसंहितेचे काय? :
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 3:48 AM