शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

रस्ते सुरक्षा अभियान: पालघरमध्ये वर्षभरात खूपच घटले एसटी अपघातांचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 1:08 AM

पालघर जिल्ह्यात एकूण ८७३ एसटी चालक असून १० वर्षे विनाअपघात बस चालविली म्हणून एकूण ५२ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

हितेन नाईकपालघर : सध्या राज्यात रस्ते सुरक्षा अभियान सुरू असून यादरम्यान सर्वसामान्यांचे वाहतुकीचे साधन असणारी एसटी किती सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरातील अपघातांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. चालक आणि वाहकांचे वेळोवेळी प्रबोधन केले जात असून, प्रशिक्षण केंद्रातून उजळणी प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधीक्षक आशिष चौधरी यांनी दिली.

पालघर एसटी परिवहन विभागांतर्गत पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू, जव्हार, वसई, अर्नाळा, नालासोपारा असे एकूण ८ डेपो असून या डेपोंतून दररोज एसटी बसच्या ३ हजार ३७४ फेऱ्यांसह १ लाख ४३ हजार किलोमीटर्सचा प्रवास केला जातो. यातून पालघर विभागाला सुमारे ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असते. यामुळे जिल्हावासीयांसाठी एसटी फायदेशीर ठरली आहे, असेच म्हणता येईल. पालघर जिल्ह्यात एकूण ८७३ एसटी चालक असून १० वर्षे विनाअपघात बस चालविली म्हणून एकूण ५२ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. त्यांची छाननी केल्यानंतर निश्चित संख्या ठरवून लवकरच सत्कार करण्यात येणार आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सत्कार थोड्या उशिराने होत आहे, असे सांगण्यात आले.

७०ला स्पीड लॉकबसेसना ७०चे स्पीड लॉक आहे. तरीही अपघात होतच असतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांना ७०चा स्पीड लॉक करण्यात आला असून, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका अपघातात एसटी चालकाचे नियंत्रण सुटून एका कारला धडक दिल्यानंतर कारमधील दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची एकमेव गंभीर अपघाताची घटना घडली होती. त्याव्यतिरिक्त एसटीसमोर पादचारी अचानक येणे, मोटारसायकलने एसटीला समोरून धडक देणे, अशा काही घटनांत अपघात होत काही गंभीर तर काही किरकोळ घटना घडल्या आहेत.

पालघरमध्ये वर्षभरातील अपघातांचे प्रमाण खूपच कमी आहे. चालक आणि वाहकांचे वेळोवेळी प्रबोधन केले जात असून प्रशिक्षण केंद्रातून उजळणी प्रशिक्षण देण्यात येते. दुसरीकडे शिबिरातून आरोग्य तपासणीसोबतच डोळे तपासणी वेळोवेळी केली जाते. - आशिष चौधरी,  विभागीय वाहतूक अधीक्षक

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार