भाईंदर : महापालिकेने भार्इंदर पूर्वेला रेल्वेस्थानकासमोर मोठा गाजावाजा करत केलेल्या रस्ता रुंदीकरणाचा नागरिकांना फायदा तर झाला नाहीच, उलट जाच वाढला आहे. बेकायदा लागणाऱ्या रिक्षा व हातगाड्या तसेच पार्किंगमुळे वाहतूककोंडी, ध्वनी, वायुप्रदूषण वाढले आहे.
भार्इंदर पूर्वेत रेल्वेस्थानकासमोरील समांतर रस्ता अरुंद असून जुन्या इमारतींमुळे संपूर्ण रुंदीकरण रखडले आहे. तर, बंदरवाडीनाका व प्रशांत हॉटेलजवळील नाका तेथील बांधकामे तोडून पालिकेने रुंद केली होती. या रुंदीकरणाला विरोध झाला, तसेच राजकीय श्रेय लाटण्याचा खटाटोपही झाला. परंतु, रस्त्याच्या दोन्ही टोकाला झालेल्या रुंदीकरणामुळे समस्या सुटली नाही. उलट, जाच वाढला आहे.या ठिकाणी फेरीवाल्यांच्या हातगाड्या तसेच टपºया वाढल्या असून भररस्ता व पदपथावर अतिक्रमण झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेस्थानकापासून १५० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई असताना सर्रास न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवले जात आहेत. फेरीवाल्यांच्या हातगाड्या व टपऱ्यांपेक्षा जास्त मुजोरी रिक्षाचालकांची सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त रिक्षा या भागात उभ्या केल्या जातात. त्यातच रिक्षातळ सोडून भररस्त्यात रिक्षा उभ्या केल्या जातात. भाडे घेण्यासाठी बेकायदा उभ्या राहणाºया रिक्षाचालकांवर कारवाई अजिबात केली जात नाही. बसस्थानकावरही रिक्षाचालकांचा विळखा असल्याने प्रवाशांना रस्त्यात थांबावे लागते. दुचाकी आणि खाजगी वाहनांचे बेकायदा पार्किंग या त्रासात आणखी भर टाकते.फेरीवाल्यांच्या हातगाड्या, टपºया, खाजगी बेकायदा पार्किंग आणि रिक्षाचालकांच्या मस्तवालपणामुळे भार्इंदर पूर्वेला रेल्वेस्थानक समांतर मार्ग व नाके प्रचंड वाहतूककोंडीने ग्रासले आहेत. वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. कोंडीमुळे वाहनांच्या लांब रांगा लागत असल्याने हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषण प्रचंड वाढले आहे. धूर व धुळीमुळे वायुप्रदूषण वाढले आहे.नागरिकांना तर पदपथ व रस्त्यावरून चालणेही जिकिरीचे झाले आहे. रस्ता ओलांडतानाही कोंडीमधून मार्ग काढणे जाचक ठरत आहे. यातून किरकोळ अपघात व गाडी लागल्याने भांडणेही नेहमीचीच झाली आहेत. प्रशांत हॉटेलनाका परिसर जॅम झाला की, रेल्वेस्थानक समांतर मार्गासह बाळाराम पाटील मार्ग व महात्मा फुले मार्गावर रांगा लागतात. सकाळपासून रात्रीपर्यंत कोंडी, रिक्षा-हातगाड्यांच्या अतिक्रमणाची स्थिती कायम असते.यंत्रणा देतीलका लक्ष?च्या जटिल समस्येकडे स्थानिक नगरसेवकांसह महापालिका, वाहतूक शाखा व नवघर पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.च्सोयीच्या गोष्टींसाठी धावणाºया या यंत्रणा भार्इंदर पूर्वेच्या रेल्वेस्थानकासमोरील या गंभीर बनलेल्या समस्येवर सातत्याने ठोस कारवाई व उपाययोजना करण्यास मात्र उदासीन असल्याने नागरिकांना या जाचातून सुटका मिळणे अवघड झाले आहे.