शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

दरोडेखोरांकडून लाखोंची लूट

By admin | Published: July 18, 2015 11:07 PM

वसई पूर्व भागात भाताणे, जांबुलपाडा, नवसई, आडणे या गावांमध्ये शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी तीन बंगल्यांमध्ये लूट करून जांबुलपाडा येथील दत्त मंदिराची दानपेटी लंपास केली.

पारोळ : वसई पूर्व भागात भाताणे, जांबुलपाडा, नवसई, आडणे या गावांमध्ये शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी तीन बंगल्यांमध्ये लूट करून जांबुलपाडा येथील दत्त मंदिराची दानपेटी लंपास केली. त्याचप्रमाणे आडणे गावातील विपुल जाधव यांची दुचाकीही चोरून नेली. या दरोडा घातलेल्या बंगल्यांमध्ये त्या रात्री कुणीही नसल्यामुळे पुढील अनर्थ टळला.अज्ञात दरोडेखोरांनी भाताणे गावातील बालकृष्ण पाटील यांचा बंगला फोडून घरातील चांदी व रोकड पळवली. त्यानंतर, त्याच गावातील सुधीर कासार यांचा बंगला फोडून सोने, चांदी व रोकड अशी १ लाखाच्या मालाची लूट केली. जांबुलपाड्यातील सुधाकर मडके यांची घरातील रोकड व त्याच गावातील दत्त मंदिरातील दानपेटी दरोडेखोरांनी पळवून नेली. नवसई गावातील दीपेश पाटील यांची दुचाकीही त्यांनी चोरली होती. परंतु, ती खराब झाल्याने त्यांनी शेतात टाकून पळ काढला. विशेष म्हणजे तिन्ही बंगल्यांत त्या रात्री कुणीही नव्हते. त्यामुळे हे दरोडे या घरांवर पाळत ठेवून टाकले असल्याचे भाताणे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनांची नोंद मांडवी पोलिसांत झाली असून पोलिसांनी दरोडा पडलेल्या बंगल्यांचा पंचनामा केला असून अज्ञात दरोडेखोरांवर गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास मांडवी पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)