लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : नुसते भोजन वर्ज करून रोजा होत नाही तर चांगले काम करून वाईट गोष्टी वर्ज करणे म्हणजे रोजा असे मत मुस्लिम समाजाचे नेते मुस्तफा मेमन यांनी कुडूस येथील इफ्तारमध्ये व्यक्त केले. वाडा पोलीस ठाण्यातर्फे मंगळवारी दि. २० कुडूस पोलीस दूरक्षेत्राच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मेमन पुढे म्हणाले, की रोजा ठेवताना तो संपूर्ण शरीराचा असला पाहिजे. डोळ्यांनी चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. शब्दही चांगलेच उच्चारले पाहिजेत, हाता पायांनी चांगले काम केले पाहिजे. कुणाची निंदा नालस्ती नको, चुकीच्या मार्गाने आलेला पैसा नको असे स्पष्ट करून अल्ला गोरगरीब पिडीत लोकांमध्ये पाहायचा असतो असे, सांगून त्यांनी रमजानचे महात्म्य विशद केले. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक, भाजपचे भगवान चौधरी, कुंदन पाटील, मंगेश पाटील, अशोक जाधव, मनसेचे गोविंद पाटील, मुस्लीम समाजाचे नेते इरफान सुसे, रफीक मेमन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमिन सिंदू, रोहीदास पाटील, काँग्रेसचे रामदास जाधव, सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, शिवसेनेचे सचिन पाटील, निलेश पाटील, आरपीआयचे रमेश भोईर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस हवालदार दयानंद लोहकरे, किशोर माळी, शंकर चौधरी आदींनी विशेष परिश्रम घेतले. पार्टीमध्ये नागरिक सहभागी झाले होते. त्यांनी इफ्तारचे जोरदार स्वागत केले. सूत्रसंचालन मनेश पाटील यांनी केले.
‘वाईट गोष्टी वर्ज्य करणे हा रोजा
By admin | Published: June 23, 2017 5:04 AM