पारोळ : सीसीटीव्ही लावण्यापासून ते अगदी सेफ्टी दरवाजा बसविण्या पर्यंतच्या अनेक शक्कल चोऱ्या टाळण्यासाठी लढविलेल्या पाहिल्या आहेत. मात्र विरार येथील पारोळ गावातील दुकानदारांनी चोºयां टाळण्यासाठी आपल्या दुकानाच्या छताला लोखंडी जाळ्या लावल्या आहेत.विरारमधील पारोळ गाव हे शहरापासून जवळजवळ २० किमी लांब आहे. तसेच या गावापासून ६ ते ७ किमी अंतरावर पोलीस चौकी आहे. या गावात मागील वर्षभरापासून सतत चोºया वाढत होत्या. पोलीसांची गस्त नसल्याने आणि महामार्गावर गाव असल्याने त्या सतत होत होत्या. म्हणून दुकानदारांनी स्वत:च पुढाकार घेऊन आपल्या दुकानाच्या छताला लोखंडी जाळ्या लावल्या. या गावात मागील वर्षभरात ३० ते ४० चोºया झाल्या आहेत. यानंतर गावाच्या वेशीवर ? महिन्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. पण ते कधीच सुरू झाले नाही. यामुळे आता गावकरीच आपल्या सुरक्षेसाठी सरसावले आहेत. गावातील बहुतांश दुकाने ही सिमेंटच्या पत्र्याची असल्याने चोरी सहज होते. पण आता या जाळ्या लावल्याने चोरीच्या घटनांना आळा बसला आहे. त्यामुळे आता आसपासच्या छोट्या-मोठ्या गावातील दुकानदारही हा नवा उपाय आपल्या दुकांनाच्या सुरक्षेसाठी करू लागले आहेत.या ठिकाणी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून छताला जाळी लावलेली असतांनाही माझ्या संगणक केंद्रात चोरी झाल्याने चोरीचे प्रकार रोखण्यासाठी या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज आहे.-निलेश पाटील, संचालक ध्रुव संगणक केंद्र
चोरी टाळण्यासाठी छताला जाळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 11:09 PM