वसई : वसईमध्ये खाजगी ट्रॅव्हल कंपन्यांनी प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे आकारल्या प्रकरणी विरार उपप्रादेशिक परिवहन विभागाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमध्ये सात खाजगी ट्रॅव्हल कंपन्यांचा समावेश असून त्यांच्या एकूण १० बसेस वर कारवाई करण्यात आली आहे.ऐन सुटीच्या काळात राज्यातील प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात खाजगी कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. अशा खाजगी वाहतूकदारां कडून नेमक्या गर्दी व सुटीच्या काळादरम्यान बेसुमार अवास्तव आणि अवाजवी अशी भाडेवाढ करण्यात येते. दरम्यान अशा खाजगी तथा कंत्राटी वाहनांच्या बेसुमार भाडेवाढी संदर्भात मा. मुंबई उच्च न्यायालयात २०११ मध्ये जनहित याचिका दाखल केल्यानंतर मात्र त्यानुसार सदर भाडेवाढ निश्चित करण्या संदर्भात सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्ट, पुणे या केंद्र शासनाच्या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती.त्यावेळी शासनाकडे दिलेल्या अहवालानुसार शासनाने याबाबत नियमावली बनवत खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे कमाल भाडे निश्चित केले होते. त्यानुसार खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे प्रति किलो मीटर भाडे दर हे त्याच स्वरूपाच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किमी भाडे दराच्या ५० टक्के पेक्षा अधिक राहणार नाही, असे निश्चित करण्यात आले होते. परिणामी, मात्र विरार-मनवेल पाडा येथून अनेक खाजगी ट्रॅव्हल कंपन्या या प्रवाशांकडून बेसुमार व अवाजवी असे ज्यादा भाडे आकारात असल्याच्या गंभीर तक्र ारी विरार उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे आल्या होत्या. या तक्र ारीच्या अनुशंघाने परिवहन विभागाच्या भरारी पथकाने तपासणी केली असता मूळ किमतीच्या दुप्पट, तिप्पट अशी भाडे वसुली होत असल्याचे उघड झाले.या सात ट्रॅव्हल्सवर बडगातूर्तास या ट्रॅव्हल कंपन्यांना सुरु वातीला नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली कागदपत्रे परिवहन कार्यालयात सादर करण्यात आली आहेत.आरटीओच्या कारवाईमध्ये शुभश्री ट्रॅव्हल, दशभुजलक्ष्मी ट्रॅव्हल, सोलनकार ट्रॅव्हल,वैभव ट्रॅव्हल, साई गणराज ट्रॅव्हल, वैभवलक्ष्मी ट्रॅव्हल आणि ओमसाईराम ट्रॅव्हल्सचा समावेश आहे.
ट्रॅव्हल्स कंपन्यांविरोधात आरटीओची कारवाई; प्रवाशांची सरसकट लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:41 PM