वसई : वसई विरार महापालिकेच्या महापौरपदी बहुजन विकास आघाडीचे रुपेश जाधव आणि उपमहापौरपदी आघाडीचेच प्रकाश रॉड्रीक्स बिनविरोध निवडून आले.विद्यमान महापौर प्रवीणा ठाकूर आणि उपमहापौर उमेश नाईक यांचा कार्यकाळ २८ डिसेंबरला संपत असल्याने बुधवारी नव्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक झाली. यावेळी मुंबई जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता पिठासन अधिकारी म्हणून उपस्थित होत्या.महापौरपदासाठी रुपेश जाधव आणि उपमहापौरपदासाठी प्रकाश रॉड्रीक्स यांचेच अर्ज आल्यामुळे मेहता यांनी दोघांचीही बिनविरोध निवड जाहिर केली.>मायेचा सल्ला...महापौरपद स्वत:च्या विकासासाठी नाही याचे भान ठेवले पाहिजे. या पदाचा वापर लोकहिताच्या कामासाठी झाला पाहिजे. कुणाच्याही दबावाखाली काम न करता तळागाळ््यातील लोकांचे हित पाहूनच काम करा. डोक्यात हवा जाऊ देऊ नकोस. रुपेश मला आई मानतो. त्यासाठी हा आईचा सल्ला आहे. याला तू समज असेही समजू शकतो, असे मावळत्या महापौर प्रविणा ठाकूर यांनी नवनिर्वाचित महापौर रुपेश जाधव यांच्या निवडीनंतर बोलताना सांगितले.>महापौरपद सर्वसाधारण वर्गासाठी असतांनाही हितेंद्र ठाकूर यांनी दलित समाजाला ते देऊ़न समाजाचा गौरव केला आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडीन. लोकहिताची काम करणार करणार. महापौरपदाला डाग लागेल, चुकीचे काम केल्याची तक्रार येईल, असे कोणतेही कृत्य माझ्या हातून घडणार नाही.- रुपेश जाधव, नवनिर्वाचित महापौर
रुपेश जाधव वसईचे महापौर, रॉड्रिक्स उपमहापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 3:05 AM