भवानी झा
ठाणे : या आषाढी एकादशीला साबुदाणा, शेंगादाणे गतवर्षीपेक्षा स्वस्त झाले असून बाकी सर्व फराळाला लागणारी सामग्री व फळे महागली आहेत. सर्वसामान्य घरामध्ये साबुदाण्याची खिचडी अथवा वडे आणि तसेच मोठया प्रमाणात वापरले जाणारे शेंगदाणे स्वस्त झाल्याने गृहिणी समाधानी आहेत.
गतवर्षी आषाढीला १२० रू. किलो असणारा साबुदाणा यंदा ९८ रू. किलो, १४० रू. किलो असणारा शेंगादाणा ११० रू. कि., ९० रू. किलो असणारा गावठी गूळ ८० रू.किलो, देशी तूप गतवर्षी ५२० रूपये किलो होते ते यंदा ४९० रू. किलो आहे. ६० रू. डझन असणारे लींबू ५० रू. डझनया दराने उपलब्ध आहे. म्हणजे तुलनात्मक रित्या स्वस्त झाले आहे. खजूर किलोमागे ४० ते ५० रू. सिडलेस खजूर प्रतिकिलो २० रूपयाने, भगर प्रतिकिलो २६ रूपयाने, राजगीरा प्रतिकिलो १२ रूपयाने डालडा प्रति किलो १० रूपयाने महाग झाले आहे. उपवासाला सर्वाधिक वापरले जाणारे फळ म्हणजे केळी, ते डझनामागे २० रुपयांनी महागले आहे. तर सफरचंद २०० ऐवजी २५० रुपये किलोने उपलब्ध आहेत. खरबूज आणि पपई सगळ्यात स्वस्त असून त्यांच्यात मात्र १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे.हे झाले स्वस्तकिराणा पदार्थ आधीचे दर आताचे दरसाबुदाणा १२० ९८शेंगदाणा १४० ११०गावठी गूळ ९० ८०-८५लिंबू ४०-६० ५०हे झाले महागखजूर ४०० ४४०-५०सीडलेस खजूर ३४० ३६०भगर ६०-७० ९६राजगीरा ९८ ११०साखर ३८ ४०गूळ ४० ६०गावराण तूप ५२० ४९०डालडा ७०-८० ९०दही १२० १३५रताळी, बटाटे, मिरच्या महागभाज्या आधीचे दर आताचे दरमोठी रताळी ६० ७०-८०गावरान रताळी ४० ५०-६०शिंगाडा - -भुईमुगाच्या शेंगा ५० ४०हिरवी मिरची ५० ४०बटाटे २० ३०कोथींबीर (जुडी) २० १००