कुमार बडदे।लोकमत न्यूज नेटवर्कमुंब्रा : कोरोना महामारीमध्ये कोणीही उपाशी राहू नये यासाठी मागील सहा महिन्यांपासून सरकार शिधावाटपधारकांना देत असलेल्या मोफत अन्नधान्याचा आता काही कुटुंबांनी चक्क व्यवसाय सुरूकेला आहे. मोफत मिळत असलेला गहू, तांदूळ ते ओळखीच्या कुटुंबांना १० रुपये प्रतिकिलो दराने विकत आहेत. मोफत मिळणारे धान्य विकणाºया आणि विकत घेणाऱ्यांच्या चेहºयावर ते यात काही गैरकरीत असल्याचा लवलेशही दिसत नाही हे विशेष.कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी २२ मार्चच्या मध्यरात्रीपासून देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी सरकारने तीन महिन्यांसाठी शिधावाटप दुकानामध्ये माणशी ५ किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली होती. अनलॉकनंतरही परिस्थिती अद्याप पूर्णपणे पूर्वपदावर आली नसल्याने ही योजना सुरू आहे.सध्या माणशी दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू विकत आणि मोफतही मिळत आहेत. तसेच प्रति शिधापत्रिकेवर उपलब्धतेनुसार एक किलो चणाडाळ किंवा तूरडाळ मोफत मिळत आहे.मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या मोफत धान्य योजनेमुळे ज्या कुटुंबांच्या शिधापत्रिकेवर जास्त नावे त्यांच्या तसेच जे रेशन दुकानामधील गहू, तांदुळाचे सेवन करीत नाहीत अशा घरांमध्ये मोफत मिळत असलेल्या गहू, तांदुळाच्या राशी जमा झाल्या आहेत. पावसाळ्यातील दमट हवामानामुळे धान्याला कीड लागण्यास सुरुवात झाल्याने काहींनी आपल्याकडील धान्याचा साठा लवकरात लवकर निकाली काढण्याच्या उद्देशाने, तर काहींनी इतर वस्तू खरेदी करण्यासाठी पैसा उपलब्ध व्हावा यासाठी मोफत मिळत असलेल्या गहू, तादुळांची १० रुपये प्रति किलो दराने विक्री करण्यास सुरुवात केली आहे.काही महिलांनी गेल्या सहा महिन्यांत १०० ते १५० किलो धान्य गोळा केले असून आता त्या विक्री करून कुटुंबाची गुजराण करीत आहेत.काही गैर करीत असल्याचा लवलेशही नाहीच्मोफत मिळणारे धान्य विकणाºया आणि विकत घेणाºयांच्या चेहºयावर ते यात काही गैर करीत असल्याचा लवलेशही दिसत नाही.च्इतर वस्तू खरेदी करण्यासाठी धान्य विकत असल्याचे उत्तर धान्य विकणाºया एका महिलेने दिले, तर किरकोळ बाजारात एवढ्या स्वस्तामध्ये धान्य मिळत नसल्यामुळे खरेदी करीत असल्याचे धान्य विकत घेणाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले.
‘मोफत’ धान्याची १० रुपये किलोने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 1:07 AM