मीरारोड - मीरा भाईंदर शहरात सर्रास पान टपऱ्या हे प्रतिबंधित गुटखा विक्रीची केंद्र बनली असून अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाई केवळ भाईंदर फाटक परिसरातील ९ पान टपऱ्यां मधून गुटखा विक्री होत असल्याचे आढळून आले.
अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत पवार, माणिक जाधव व भरत वसावे ह्या तिघांनी वरिष्ठांच्या आदेशा नुसार नवघर पोलिस ठाण्यातील जे जे मुल्ला व किरण नेरपगार यांच्यासह मिळून भाईंदर पूर्वेच्या फाटक मार्गवरच्या पानशॉप वर गुरुवारी धडक कारवाई केली. फाटक लगतच्या परिसरातील ९ पान टपऱ्यांवर बंदी असलेला गुटखा सर्रास विकला जात असल्याचे आढळले असून तेथून १० हजारांचा गुटखा साठा जप्त केला आहे.
साईबाबा मंदिर जवळच्या ओमसाईधाम पान भांडारचा चालक सत्यनारायण तिलकधारी गुप्ता ( ५५ ) रा. अलकापुरी, नालासोपारा ; शिवरुद्र अपार्टमेंट मधील संजय पान शॉपचा संजय रामधनी गौड (४० ) ; टारझन बारच्या बाजूला विश्वकर्मा पान शॉप चा विजयकुमार रामखिलावन विश्वकर्मा ( ४३ ) ; अंजली बिल्डिंग मधील पारसनाथ भोजनालय पानशॉपचा भागवत जल्लू विश्वकर्मा ( ३६ ) रा. कृष्णधाम, साईबाबा रुग्णालय जवळ ; कस्तुरी बस स्टॉप जवळ मंजय पान शॉपचा संजय रामधनी गौड ( ३७ ) व बाबा पानशॉपचा अनिलकुमार रामधनी गौड ( ३७ ) दोघेही रा. शिवरुद्र अपार्टमेंट ; पांचाळ इस्टेट मधील मनोज पानशॉपचा मनोज शमानंद जयस्वाल ( ४६ ) रा. नर्मदा अभिषेक, नर्मदा नगर ; ज्योती बारच्या बाजूला जितू पानशॉपचा चालक जितबहाद्दर शिवभजन गुप्ता (३१ ) रा. संतोष भुवन, नालासोपारा व कस्तुरी बस स्टॉप मागे प्रवीणकुमार पानशॉप चा प्रवीणकुमार हिरालाल प्रजापती ( ४६ ) ह्या ९ जणांच्या पान दुकानावर धाडी टाकून गुटखा साठा जप्त करण्यात आला.
सदर पान टपरी चालकांनी त्यांना बबलू खान हा इसम गुटखा पुरवत असल्याची माहिती दिली. प्रशांत पवार यांच्या फिर्यादी वरून नवघर पोलीस ठाण्यात शुक्रवारी ९ पानटपरी चालक व गुटखा पुरवणारा बबलू खान अश्या १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.