शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

गावांना हाेणार समदाबाने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 11:38 PM

सफाळे येथे आयआयटी मुंबईचा प्रकल्प : देशातील पहिलाच प्रयाेग

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्क पालघर/सफाळे : अनेक वर्षांपासून अडचणीत असलेली उंबरपाडा नंदाडे १७ गावे पाणीपुरवठा योजनेला पुनरुज्जीवित करून शेवटच्या गावापर्यंत समान दाबाने पाणी पोहाेचण्यासाठी सफाळे ग्रामपंचायतीने आयआयटी, मुंबईच्या सहकार्याने पुढाकार घेतला होता. कमी खर्चात संपूर्ण गावाला समान दबाने पाणीपुरवठा करण्याचे तसेच अत्यंत कमी जागेत उभी राहणारी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरत आहे. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर पाणी पुरवठा करणाऱ्या संस्थांनी विविध ग्रामपंचायतीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शिफारस केंद्रीय स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने केली आहे.सफाळे येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने करवाळे धरणातून उंबरपाडा नंदाळे १७ गावे नळ पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतल्यानंतर २००३ मध्येे ही योजना सुरू करण्यात आली होती. त्या योजनेत उंबरपाडा, सफाळे, कर्दळ, माकणे, मांडे, विराथन बुद्रुक, जलसार, करवाळे, नवघर, वाढीव आदी गावांचा समावेश करण्यात आला होता. अनेक गावांत पाणीच पोहोचत नसल्याची ओरड होत असल्याने आयटीचे प्रोफेसर डॉ. प्रदीप काळबर यांना सफाळे ग्रामपंचायतीने पाचारण केले होते.त्यांनी या योजनेचा अभ्यास करून ५० हजार ते एक लाख लीटर क्षमतेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील पाण्याच्या टाकीला १० ते २० लाखांचा येणाऱ्या खर्चात बचत करून पाणी पुरवठा करण्यासाठी 'शाफ्ट' ही दोन पाइपमधली व्यवस्था निर्माण केली आहे. यासाठी पूर्वीच्या काळामध्ये वापरल्या जाणाऱ्या 'खांब' या तंत्रज्ञानाचा वापर डॉ. काळभोर यांनी केला. अवघ्या सुमारे दोन लाख रुपये खर्चून उभारलेल्या या पहिल्या शाफ्टमुळे सफाळे डोंगरी भागातील पाच हजारांहून अधिक नागरिकांना याचा लाभ होणार आहे. या गावांमध्ये असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील तीन जलवाहिन्यांना शाफ्ट, मनिफॉल्ड व मास्टरपीस अशी उपकरणे बसवण्याचे काम सुरू आहे. गावात निर्माण होणारी सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करण्याची प्रकल्प सफाळे ग्रामपंचायतीने हाती घेतला असून पाण्याचा समग्र व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने सफाळे उंबरपाडा ही ग्रामपंचायत संपूर्ण जिल्ह्यात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या कमी खर्चातील प्रभावी तंत्रज्ञानाचा जिल्ह्यात अधिकाधिक प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे आयआयटीचे प्रा. प्रदीप काळबर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

केंद्रीय पाणीपुरवठा विभागाच्या संचालकांची शिफारसखांबाच्या आकाराचा शाफ्ट कमी खर्चात उभारून सर्व वाहिन्यांवर समदाब निर्माण करण्याची क्षमता असलेले तंत्रज्ञान देशात पूर्वापार जायचे. त्याचे अनुकरण व प्रात्यक्षिक सफाळे येथे करण्यात आले. या तंत्रज्ञानाचा सर्व ग्रामीण नळपणी योजनांमध्ये वापर करावा, असे केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या संचालकाने राज्याच्या प्रधान सचिवांना पत्राद्वारे कळवले आहे.