शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

रेतीमाफियांच्या बोटी पेटवल्या

By admin | Published: June 14, 2016 12:41 AM

पश्चिम रेल्वेच्या सफाळे-वैतरणा दरम्यानच्या पुलालगत प्रतिबंधित भागात जाऊन बेकायदेशीर रित्या रेती उत्खनन करण्याऱ्याना सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ४५ रेतीच्या बोटी

पालघर : पश्चिम रेल्वेच्या सफाळे-वैतरणा दरम्यानच्या पुलालगत प्रतिबंधित भागात जाऊन बेकायदेशीर रित्या रेती उत्खनन करण्याऱ्याना सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ४५ रेतीच्या बोटी जप्त करून त्या महसूल विभागाच्या कारवाईत आज जाळून टाकण्यात आल्या. यावेळी प्र्रांताधिकारी शिवाजी दावभट यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईमध्ये रेतीसाठेही जप्त करण्यात आले.पालघर जिल्हयाच्या निर्मितीनंतर मोठी मोठी रहिवासी संकुले उभी राहत असून अनेक ठिकाणी रेती उत्खनन व वाहतुकीला बंदी असल्याने रेतीची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चोरट्या व धोकादायक पध्दतीने रेती उत्खनन सुरू आहे.सफाळे-वैतरणा दरम्यानच्या वैतरणा खाडीवर उभारलेल्या पुलावरून मुंबई, गुजरात व दिल्ली इ. ठिकाणी प.रे. मध्ये रेल्वे, व उत्तर रेल्वेच्या सुमारे २५० रेल्वे ये जा करीत असतात. हा पूल ४० ते ५० वर्षापूर्वी बांधण्यात आले असून खारट पाणी व हवा तसेच रेल्वे ट्रेन्सच्या मोठ्या वर्दळीमुळे या पुलाचा काही भाग कमकुवत बनला होता. त्यामुळे नुकताच पश्चिम रेल्वेने या पुलाच्या दुरूस्तीसाठी मोठा जम्बो मेगाब्लॉक घेतला होता. दोन वर्षापूर्वीही वैतरणा पूल क्रमांक ९२ हा खचल्याने या पुलावरून २० ते ३० किमी प्रतितास इतक्या हळू वेगाने रेल्वे ट्रेन्स सोडल्या जात होत्या. या पुलाची दुरूस्ती करण्यात आल्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत पणे सुरू झाली असती तरी रेतीचा भाव गगनाला भिडल्याने पुन्हा रेल्वेपुलाचा प्रतिबंधित भागात मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन सुरू केले होते. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला होता तसेच वाढीव वैतीपाड या बेटाच्या संरक्षण बंधाऱ्यालगत जबरदस्तीने रेती उत्खनन होऊन वाढीव बेटावर असणाऱ्या घराना धोका निर्माण झाला होता. वाढीव सरावली वैतीपाडा ग्रामपंचायती व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे तक्रार केली होती. (वार्ताहर) मनाई हुकूम बजावला होतासफाळे वैतरणा पुलाच्या सहाशे मीटरच्या प्रतिबंधित भागात कुणीही उत्खनन करू नये तरी खानिवडे, हेदवडे, चिमणे, काशिद, कोपर,खांदीप, उसगाव, नारिंगी, चिखले डोंगर, वुसराली, वैतरणा, खार्डी, डोलीव, शिरगावसह इतर भागातही रेती उत्खनन करणाऱ्यावर सक्त मनाई करण्यात येऊन त्यांच्या रेती उत्खननामुळे वैतरणा सफाळे पुलाला धोका निर्माण झाल्याची मनाई हुकूम बजावण्यात आला होता. या मनाई आदेशाबरहुकूम रेती उत्खनन करताना आठवून आल्यास राष्ट्रीय सुरक्षा कायदा १९०८ मोका १९९ अन्वये कारवाईचे आदेशही बजावण्यात आले होते.महिलांचा जमाव; वातावरण तंगमहसूल विभागाच्या या आदेशाकडे दुर्लक्ष करून वैतरणा सफाळे पुलाच्या अगदी जवळ दिवसाढवळया रेती उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सोमवारी उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शिवाजी दावभट, तहसीलदार तथा परिविक्षाधीन अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्यासह पोलीस बंदोबस्तात कांदळवनच्या रेतीबंदरामध्ये रेतीउत्खनन करून उभ्या असलेल्या होड्यांना आग लावून त्या उध्वस्त करण्यात आल्या. इतर होड्यांवर तसेच रेतीसाठ्यावर कारवाई करण्यात येईल, असे डॉ. कनिचे यांनी सांगितले. या महसुलाच्या कारवाईदरम्यान महिलांचा मोठा सहभाग असलेला जमाव घटनास्थळी जमला होता व वातावरण तंग बनले होते.