नंदकुमार टेणीपालघर : कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार व स्वर्गीय पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम यांना बिनशर्त पाठींबा देऊन व त्यांच्या विरोधात उमेदवार उभा न करून शिवसेनेने भाजपवर मात केली आहे. तसेच पालघर मध्ये श्रीनिवास वनगा यांना पाठींबा द्या आणि त्या बदल्यात भंडारा गोंदिया मतदारसंघात सेनेचा पाठींबा घ्या अशी घोषणा करून उध्दव ठाकरे यांनी भाजपवर कुरघोडीची हॅट्रीक केली आहे.वैैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी गुरूवारी घोषणा केली होती की कडेगाव पलूस मधील काँग्रेसच्या उमेदवाराला आम्ही पाठींबा देऊ त्या बदल्यात काँग्रेसच्या उमेदवाराने पालघरमधून माघार घ्यावी. विशेष म्हणजे महाजन यांचे हे उद्गार हवेत विरण्यापूर्वीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपने अशी कोणतीही आॅफर दिलेली नाही. असा खुलासा केला. एकीकडे विश्वजीत कदम यांच्या विरोधात देशमुख यांच्या रूपाने उमेदवार उभा करायाचा आणि वरून पाठींब्याची आॅफर द्यायची हा भाजपाचा दुटप्पीपणा आहे. जर भाजपाला विश्वजीत यांना पाठींबा खरोखर द्यायचा असता तर त्याने सेनेने जसा त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नाही तसा उमेदवार उभा केला नसता असे सेनेने म्हटले आहे.
सेनेची भाजपावर पुन्हा कुरघोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 6:45 AM