डहाणू : डहाणू तालुक्यातील ८५ ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया लहान मोठ्या अशा दहा ते बारा ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामसेवकाच्या बदल्या नुकत्याच जिल्हा परिषद प्रशासनाने केल्या आहेत. परंतु काही ठिकाणी नवीन ग्रामसेवक हजर झाले असले तरी अद्याप मोठ-मोठ्या ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी रुजू झाले नसल्याने जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाही तोपर्यंत जुन्या ग्रामविकास अधिकाºयाला कार्यमुक्त करू नये, अशी मागणी सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने डहाणूचे गटविकास अधिकारी बी.एच. भरक्षे यांना केली आहे.साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात १७४ महसूल गावे असून ९६० लहान-मोठे पाडे आहेत. डहाणूच्या जंगलपट्टी तसेच बंदरपट्टी भागातील दोन-तीन ग्रामपंचायतीचा कारोभार एका ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने डहाणूतील दुर्गम भागातील असंख्य गावांचा विकास खुंटला आहे. शिवाय शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी, तसेच ना हरकत इत्यादी ग्रमपंचायतीचा दाखला घेण्यासाठी ग्रामस्थांना दिवसभर लांब पल्ल्यांवर असलेल्या ग्रामपंचायतीत जावून ग्रामविकास अधिकाºयांना शोधावे लागते. त्यामुळे गावाचा विकासासाठी पूर्णवेळ ग्रामसेवक गरजेचे आहे.पालघर जिल्हा परिषद प्रशासनाने पालघर लोकसभेच्या निवडणुकीनंतर डहाणूतील बावडा, गुंगवाडा, रायतळी, वाढववण बरोबरच माडेगाव, चिंचणी, वरोर, आशागड, दाशोमी इत्यादी सारख्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाºयाच्या बदल्या केल्या. एक-दोन ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकारी संबंधित ग्रामपंचायतीला हजर झाले असले तरी आधीच बहुसंख्य पंचायतील प्रशासकीय अधिकारी हजर झालेले नाहीत. त्यातच पालघर जिल्हा परिषदेने १७ जूनच्या एका आदेशान्वये बदली झालेल्या ग्रामविकास अधिकाºयांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.ग्रामविकास अधिकाºयाविना ग्रामपंचायत चालणार कशी? केव्हा मिळणार प्रशासकीय अधिकारी असा प्रश्न ग्रामस्थ करीत असून जोपर्यंत नवीन प्रशासकीय अधिकारी संबंधित ग्रामपंचायतीत हजर होत नाही तोपर्यंत विद्यमान अधिकाºयाला कार्यमुक्त करू नये, अशी मागणी तालुक्याभराूतन होऊ लागली आहे.
'सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांची मागणी ग्रामविकास अधिकाऱ्यांना सोडू नये!'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 10:40 PM