वसई : पालघर जिल्हाधिकाऱंनी १५ मार्चपासून हस्तलिखित फेरफार नोंदी बंद करून सातबारा उतारे आॅनलाईन करण्याचे काम सुरु केले आहे. पण, वसईत आॅनलाईनचे काम रखडल्याने शेतकरी आणि गरजूंची कोंडी झाली आहे. त्यामुळे आॅनलाईनचे काम पूर्ण होईर्पंत गरजवंतांना हस्तलिखित सातबारा उतारे देण्यात यावेत, अशी मागणी कोकण आयुक्तांकडे करण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वसई तालुक्यात हस्तलिखित सातबारा, फेरफार देण्याचे बंद करण्यात आले आहे. दुसरीकडे, आॅनलाईनचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सामान्य जनता, आदिवासी आणि बहुसंख्येने शेतकरी असलेल्यांना शेतीची कामे, बँकेची कामे यासह विविध सरकारी योजनांसाठी आवश्यक असलेले सातबारा, फेरफार मिळेनासे झाल्याने बँकेचा बोजा, वारस फेरफार सुविधा मिळवण्यात अडचणीत येत असल्याची तक्रार वसई शहर काँग्रेसचे अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो यांनी कोकण आयुक्तांकडे केली आहे. (प्रतिनिधी)- आॅनलाईनची सुविधा पूर्ण होईर्पंत लोकांची गैरसाये दूर करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच हस्तलिखित सातबारा, फेरफार देण्यात यावेत, अशी मागणी फुर्ट्याडो यांनी आयुक्तांकडे केली आहे. - वसई तहसिल कार्यालयातील कामकामावर जनता नाराज असून याठिकाणी प्रत्यक्ष येऊन पाहणी करून संबंधित अधिकारी व तलाठी यांच्या कामकाजाचा आढावा घ्यावा, अशी विनंतीही फुर्ट्याडो यांनी केली आहे.
सातबारा आॅनलाइनचे काम रखडले
By admin | Published: August 28, 2016 3:56 AM