पालघर : हा शनिवार अपघातवार ठरला. जांभा या गावी वाहनाची वाट पाहणाऱ्या पाच जणांना कारने चिरडले. त्यातील एक जागीच ठार झाला. तर दोन गंभीर आहेत. जव्हार नजिकच्या पोशेरे येथे ट्रकने एसटीला हुल दिल्याने ती रस्त्याखाली घसरली व अनेक प्रवासी जखमी झाले तर वधना येथे मॅजिकने मोटारसायकलचा चेंदामेंदा केल्याने चालकजागीच ठार झाला.तीन जखमी, दोन गंभीर ; चालक फरार, ग्रामस्थांचा ठाण्यात ठिय्याविक्रमगड : या शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जांभानजीक एका धाब्यांच्या बाजूला वळणावर गाडीची वाट बघत असलेल्या पाच तरुणांना एका कारने काल सायंकाळच्या सुमारास धडक दिल्याने मुन्ना सुरेश दुमाडा हा जागीच ठार झाला, तर त्याच्या जोडीला असलेला गणेश किसन निंबारा(२४)यांची प्रकृती गंभीर आहे तो सध्या जव्हार येथे उपचार घेत असून त्याला नाशिक येथे हलविण्यात येणार आहे. तर सचिन जयराम मराड(१६)व रविनाथ मधुकर दुमाडा(१४)हे जखमी असून उपचार घेत आहेत.हे सर्व तिवसपाडा येथील आहेत. ते जांभा येथील क्रिक्रेट मॅचेस बघण्याकरीता आले होते व परतत असतांना हा अपघात घडला. दरम्यान कारचालक पळून गेल्याने गावकऱ्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. चालकाला अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी कार जप्त केली आहे. दोन दिवसांत आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिल्यावर जमावाने मृतदेह ताब्यात घेतला. चालकाच्या प्रसंगावधाने भीषण दुर्घटना टळलीमोखाडा : जव्हारहून शिर्डीला जाणाऱ्या बसला पोशेऱ्या जवळील लेंडी नदीच्या वळणावर नाशिकहून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने सकाळी ७.१५ च्या दरम्यान कट मारल्याने होणारी भीषण दुर्घटना बसचालकाच्या प्रसंगावधानाने टळली. बस नाल्यात कलंडली मात्र प्रवासी किरकोळ जखमी झाले असून बसचे मोठे नुकसान झालेबाबासाहेब सुखदेव झुराळे (३३) सुखदेव बापूराव झुराळे (६०) आदी एकाच कुटुंबातील ९ ते १० प्रवासी जखमी झाले असून ते मोखाड्यावरून देवीच्या दर्शनासाठी वणीला निघाले होते व हे प्रवासी परभणी औरंगाबादचे रहिवासी आहेत. या जखमी प्रवाशांना बस डेपो कडून किरकोळ स्वरूपात मदत देण्यात आली असून टेम्पो चालकांवर अपघात नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक विटकर करीत आहेत. (वार्ताहर)वधना अपघातात १ ठार, १ जखमी डहाणू : डहाणूहून चारोटीकडे जात असलेल्या भरधाव दुचाकीची रानशेत वधना येथील धोकादायक वळणावर मिनीडोरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली. निबन मलिक (३४) सराविल (पालघर) असे मयत इसमाचे नाव असून अन्य एका जखमीस कासा उपजिल्हा रु गणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डहाणू पोलीस स्टेशन मध्ये अपघाताची नोंद असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
शनिवार अपघातवार २ ठार, अनेक जखमी
By admin | Published: January 15, 2017 5:12 AM