पारोळ : क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थीतीत उपेक्षितांच्या न्याय्य हक्क आणि सन्मानासाठीचे कार्य केले. धैर्याने लढण्याचा त्यांचा गुण विद्यार्थीनींनी आत्मसात करावा असे प्रतिपादन विधायक संसदेचे सहसचिव प्रदिप खैरकर यांनी केले. विधायक संसद संचालित एकलव्य परिवर्तन विद्यालयाने उसगावडोंगरी येथे आयोजित केलेल्या सावित्रीबाई फुलेंच्या १८५ व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. सहशिक्षिका स्नेहा थुळे, प्रतिक्षा पाटील व मीलन कांबळे यांनी स्पर्धांचे परिक्षक म्हणून काम पहिले. मुख्याध्यापक उमेश पष्टे, शाळेच्या अधिक्षिका विजया पाटिल व भूपेंद्र कर्वे हे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मयूरी, दर्शना, दशरथ, हिलीम व पूजा पवार यांनी केले. विजेत्या स्पर्धकांचे मान्यवरांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)
सावित्रीबाई फुलेंचे धैर्य विद्यार्थिनींनी बाणवावे!
By admin | Published: January 06, 2017 6:01 AM