शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
2
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
3
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
4
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
5
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
6
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
7
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
8
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
9
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
10
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
11
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
12
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
13
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
14
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
15
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
16
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
17
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
18
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
19
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 

‘आमची वसई’ची दुर्गभ्रमंती व अभ्यास मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 10:56 PM

दुर्गप्रेमींसाठी विनामूल्य कार्यक्रम; ऐतिहासिक दाखल्यांसह तज्ज्ञांकडून सहभागींना माहिती

वसई : मागील अनेक गड-किल्ल्यांच्या भ्रमंतीनंतर लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा आमची वसईतर्फे (गडकिल्ले) दुर्ग भ्रमंती व अभ्यास मोहीम सुरू करण्यात आली आहे.आमची वसई या सामाजिक समूहाने रविवार दि. २९ डिसेंबरपासून वसई दुर्ग भ्रमंती व अभ्यास मोहीम हा विनामूल्य कार्यक्रम पुन्हा एकदा आयोजित केला होता. या उपक्रमाला जनतेने भरपूर प्रतिसाद दिल्याची माहिती ऋषिकेश वैद्य यांनी ‘लोकमत’ला दिली.या मोहिमेत वसईच्या इतिहासाची व तेथील वास्तूची प्रत्यक्ष स्थळी जाऊन सविस्तर माहिती तज्ञ मंडळींनी उपस्थितांना दिली. या प्रसंगी सर्व वयोगटातील शेकडो दुर्गप्रेमी, इतिहास-वास्तू अभ्यासक व निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. या भ्रमंतीत वसई-विरारमधूनच नव्हे तर वैतरणा, सफाळे, केळवे, पालघर, तारापूर, डहाणू, मुंबई, पनवेल, डोंबिवली इत्यादी ठिकाणाहून किल्लेप्रेमी लोक सहभागी झाले होते. यामध्ये ७५ वर्षांच्या आजी-आजोबांपासून ते ४ वर्षांच्या चिमुकल्यापर्यंत अनेकांनी उत्साहाने सहभाग घेतला.सुरुवातीला सकाळीच सर्वांनी किल्ल्यातील स्मारकात चिमाजी आप्पांना मानवंदना अर्पण केली. तेव्हा जय वज्राई- जय चिमाजीच्या जयघोषाने अवघा वसई दुर्ग दुमदुमला. तर ऐतिहासिक श्री नागेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात भगवान परशुरामांद्वारे निर्मित वसईच्या निर्मितीपासून शिलाहार, गौतमीपुत्र, बिंबदेव, नाथाराव भंडारी, पोर्तुगीज, मराठा राज्यकर्त्यांचा इतिहास उपस्थितांना सांगितला गेला. तसेच मराठ्यांच्या रणनीती-राजनीतीचेही ऐतिहासिक दाखले या वेळी देण्यात आले.काय आहे मोहीम...जलपानानंतर दुर्ग भ्रमंती सुरू झाली. त्यात नागेश महातीर्थ, बालेकिल्ला, किल्ल्यातील साखर कारखाना, शिबंदी, मिझरी कॉर्दिया, नगरपालिका, सिनेट हाऊस, बाजारपेठ, आश्रम, विविध देवळे, महाविद्यालय, वखार, मठ, विविध आकाराच्या विहिरी, १० बुरुज, चक्री जिना, सागरी व भुई दरवाजा, सतीचा पार, ध्वजस्तंभ, पाण्याची विविध कुंडे, स्नानगृह इत्यादी वास्तूंची भेट व त्यांची सविस्तर माहिती सांगण्यात आली. याप्रसंगी उपस्थित किलेप्रेमींनी लवकरच पुढील मोहिमा आखण्याचाही आग्रह धरला.