शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

मोखाड्यात टंचाईच्या झळा; हंडाभर पाण्यासाठी मायलेकींची मैलोन्मैल पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 11:10 PM

तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधींकडून होणारे प्रयत्न तोकडे असल्याने आदिवासीची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट अजुन ही थांबलेली नाही.

- रविंद्र साळवे मोखाडा : तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधींकडून होणारे प्रयत्न तोकडे असल्याने आदिवासीची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट अजुन ही थांबलेली नाही. नियोजनाचा अभाव, अपयशी ठरलेल्या २४ नळ पाणी पुरवठा योजना, जलयुक्त शिवार योजना आदींमुळे टँकर मुक्त गावाची संख्या वर्ष निहाय वाढत चालली आहे. लांबच लांब पायपिट करुन हंडाभर पाणी मिळत असल्याने हाताला काम नको, खायला अन्न नको पण प्यायला पाणी द्या अशी आर्त हाक येथील आदिवासी गावकऱ्यांनी दिली आहे.तालुक्यात जवळपास ५ मोठी धरणे असुन तेथून १२० किलो मीटर अंतरावर असणाऱ्या मुबंई शहराला पाणी पुरवठा होत आहे. मात्र, स्थानिक गाव पाडे पाण्याविना तहानलेलिच आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील ४६ गाव पाड्यात पाणी बाणीचे संकट निर्माण झाले असून दिवसाआड टंचाई ग्रस्त गाव पाड्यांना १५ टँकर ने पाणी पुरवठा सुरू आहे. दररोज वेगवेगळ्या गावातून टॅँकर मागणीचे प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाकडे येऊन धडकत असल्याने प्रशासनाची देखील धावपळ उडत आहे.उन्हाळ्याच्या सुरवातीला दरवर्षी उद्भवणाºया परिस्थिती वर कायम स्वरु पी तोडगा काढण्याचे शहाणपण मात्र कोणालाच सुचत नसल्याने गाव पाडे वासियांकडुन रोष व्यक्त केला जात आहे. गाव पाड्यांना पाणी पुरवठा करणाºय विहिरींपासुन टंचाई ग्रस्त गाव पाडे २०-२५ किलो मीटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागत आहे.महत्त्वाची बाब म्हणजे टंचाई ग्रस्त नागरिकांना हातातली कामे सोडुन देऊन घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे तर टँकर चालु असलेल्या गाव पाड्यांतील जनतेला चातक पक्षा प्रमाणे टँकर ची दिवसभर वाट बघावी लागत असुन मोलमजुरी करु न पोटाची खळगी भरणार्या आदिवासी बांधवाची मोठी अडचण झाली आहे.दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने संताप : राज्य शासनाने जव्हार मोखाडा हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. टंचाईग्रस्त गावपाड्यांना त्वरित पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु असे असताना देखील तालुक्यातील कीनिस्ते, शेलमपाडा, धामोडी, पाथर्डी, डोंगर वाडी, वशिंद या गावपाड्यांना दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने येथील आदिवासीची पाण्यासाठी होणारी पायपीट आणखी वाढली आहेपुढाऱ्यांवर रोषआगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून विजयाची गणिते जुळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून कंबर कसली जाणार आहे. परंतु गेल्या अनेक निवडणुकांच्या आश्वासनात येथील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. भूमिपुत्रांचेच्या हक्काचे पाणी मुबंईला पुरवले जाते परंतु स्थानिक पाणी टंचाई भोगत आहेत.धरना लगत असलेल्या गावांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना नकरता टँकर लॉबीच्या घशात कोट्यवधी रु पये घालण्याचा वाझोटा प्रयत्न दरवर्षीच प्रशासनाकडून केला जात आहे. यामुळे पाण्याच्या प्रश्नावरु न पुढाºयांना रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई