शहरं
Join us  
Trending Stories
1
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
2
आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
3
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
4
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
6
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
7
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानला अतिरिक्त सुरक्षा; शुटिंगचे ठिकाण, फार्महाऊसवर नजर
8
लोणकर बंधूंकडून शूटर्सला पैशांचा पुरवठा, शस्त्रही दिले; पुण्याच्या डेअरीत बसून केले प्लॅनिंग
9
बाबा सिद्दिकी वांद्र्यातील रिअल इस्टेट किंग कसे बनले? असा सुरू झाला होता प्रवास
10
मी अल्पवयीन म्हणणारा निघाला २१ वर्षांचा! न्यायाधीशांच्या घरी भरले कोर्ट 
11
Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण
12
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
13
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
14
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
15
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
16
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
17
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
18
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
19
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश

टाकाऊ पासून किल्ले संवर्धनाचा देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 12:39 AM

विक्रमगड शहराजवळील ओंदे गावांतील विक्रांत युवा मित्र मंडळ, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून यंदा या इतिहासकालीन लोप पावत चाललेले किल्ल्यांच्या सवर्धनाच्या दृष्टिकोनातून संदेश देणारा देखावा तयार करण्यात आला आहे.

राहुल वाडेकर विक्रमगड : विक्रमगड शहराजवळील ओंदे गावांतील विक्रांत युवा मित्र मंडळ, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून यंदा या इतिहासकालीन लोप पावत चाललेले किल्ल्यांच्या सवर्धनाच्या दृष्टिकोनातून संदेश देणारा देखावा तयार करण्यात आला आहे. या देखाव्यात गंभिरगड व अशेरीगड तयार केले असून त्या साठी टाकाऊ वस्तू ( फेकून दिलेल्या वस्तू) माती, गोंनपाट, बांबुच्या काठ्या, भंगारातील तार, हिरवळीसाठी मोहरी आदि. वस्तुचा वापर करून मनाला स्पर्श करणारा मनमोहक इको फ्रेंडली देखावा साकारला आहे.यंदा मंडळाचे ९९ वे वर्ष असून त्या निमित्ताने निवडलेला विषय तडीस नेण्यासाठी मंडळाकडून गंभीरगड, आशेरीगड व भुपतगड या किल्ल्यांना वर्षभरामध्ये अनेकदा भेटी देण्यात आल्या. अर्थात या भेटी केवळ पर्यटन नसून या निमित्ताने पर्यटकांचे प्रबोधन होईल, त्यांच्याकडून किल्लयाच्या परिसराला कोणतीही हानी पोहचणार नाही याकरीता फलक लावण्यात आले आहेत. पुढील वर्षी या गणेश उत्सवाला १०० वर्ष पूर्ण होणार असल्याने सामाजिक दृष्टी कोनातून वेगळा सामाजिक संदेश देणारा देखावा साकारण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे लोकमतला सांगण्यात आले.या मंडळाच्या आलेखातील सामिजिक व जनजागृतीच्या दृष्टीने २००४ हे वर्ष महत्याचे असून त्यावेळी साकारलेला एड्स जनजागृती देखावा ठाणे जिल्ह्यात प्रथम पारोतोषिकाचा मानकरी ठरला होता. तर २००६ मध्ये व्यसन मुक्ती आकर्षक देखाव्यासाठी विक्र मगड पोलिस स्टेशन तालुक्यात प्रथम पारितोषिक या मंडळाला मिळाले आहे. गेल्या वर्षी या मंडळाने लोकमान्य टिळक आकर्षक देखावा स्पर्धा ( महाराष्ट्र शासन) स्पर्धेत भाग घेतला होता. या वेळी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ हा मनाला स्पर्श करणारा देखावा तयार केला होता.रात्री सादर होणाºया सांस्कृती कार्यक्रमात किल्ले संवर्धन व इतिहासावर आधारीत छोट्या नाटिका मंडळाचे सदस्य सादर करुन किल्ले संवर्धनाचा संदेश देत आहेत. यातून त्यांच्या कला गुणांना वाव मिळतो.या वर्षी किल्ले संवर्धन देखाव्या शेजारी किल्ले संवर्धनाचा संदेश देणारी पोस्टर्स लावली आहेत. त्याच प्रमाणे देखाव्या शेजारी विविध किल्ल्याचा इतिहास याचे पोस्टर देखील मंडळाने सादर केले आहेत. शिवाय मंडळाकडून भारतीय इतिहासावर नाटीका सादर केल्या जात असून प्रबोधन केले जाते.