विक्रमगड : विज्ञानाची कास धरून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रयोग सादर करावे व या प्रयोगातून एखादा शास्त्रज्ञ बनावा यासाठी हे लहान मुलांचे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले असून या प्रयोगातून मुले मोठी व्हावीत, अशी अपेक्षा नवनिर्वाचित आमदार सुनील भुसारा यांना व्यक्त केली.
आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी घडला पाहिजे, चांगले शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी ही धडपड आहे. या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील जवळजवळ ४०-५० शाळांनी सहभाग घेतला होता.
या प्रदर्शनात शेतीवरील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, श्वाश्वत शेती, पाण्याची बचत, सौर ऊर्जा वापर, पवन ऊर्जाचा वापर, घरगुती पाणी बचत वितरण, वनस्पती औषध उपयोग, स्वच्छ व आरोग्य, जलचलित यंत्रे, फवारणी यंत्र, आरोग्य व स्वच्छता असे विविध प्रकल्प मांडण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार सुनील भुसारा यांच्यासह गटविकास अधिकारी ईश्वर पवार, गटशिक्षणाधिकारी मोकाशी, पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव, शिवा सांबरे, पंचायत समिती सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.