शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

डहाणू समुद्रकिनारी सिगल निरीक्षणाची पर्वणी, पर्यटनाचे नवे दालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:27 AM

डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरून प्रवास करताना हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी मुद्दामहून रस्त्यालगत वाहने थांबवली जातात. त्यांची चाललेली हितगुज ऐकण्यासाठी पक्षीवेडे तासन्तास घालवतात.

- अनिरु द्ध पाटीलडहाणू/बोर्डी : पावसाळा लांबल्याने हिवाळ्याच्या प्रारंभी दाखल होणाऱ्या सिगल पक्ष्यांचे थवे मार्च महिन्यात दृष्टीस पडत आहेत. त्याची दखल स्थानिक आणि पर्यटक घेत आहेत. पक्षी निरीक्षणाद्वारे पर्यटनाच्या या नव्या दालनाच्या विकासाची आवश्यकता व्यक्त होत आहे.तालुक्याला ३५ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड, पारनाका या स्थळांनी पर्यटकांप्रमाणेच विविध जातींच्या पक्षांनाही भुरळ घातली आहे. घोलवड, बोर्डी आणि नरपड-चिखले खाडी पुलानजीक दरवर्षी हिवाळ्याच्या प्रारंभी सिगल पक्ष्यांचे आगमन होते. मोठ्या संख्येने थव्यातून फिरत असल्याने त्यांचा वावर दखल घ्यायला लावणारा आहे. पावसाळा लांबल्याने या वेळी त्यांची संख्या कमी होती. मात्र मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही संख्या वाढू लागली आहे. त्यांच्या जवळ गेल्यावर ते लगेच उडत नसल्याने त्यांच्या निरीक्षणाची पर्वणी मिळते आहे.डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरून प्रवास करताना हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी मुद्दामहून रस्त्यालगत वाहने थांबवली जातात. त्यांची चाललेली हितगुज ऐकण्यासाठी पक्षीवेडे तासन्तास घालवतात. किनाºयावर थव्यांमधून दाटीवाटीने बसलेले, घिरट्या घालणारे आणि लाटांवर पोहणारे अशा सिगलांच्या क्रीडा कॅमेºयात टिपण्यास येणारेही अनेकजण आहेत. नरपड-चिखले खाडी पूल, घोलवड खाडी-नजीक कांदळवन तसेच महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील काही पाणथळ जागांवर जाऊन नेमाने पक्षी निरीक्षण करीत असल्याची माहिती काही पक्षी अभ्यासकांनी दिली. या वेळी लहान-मोठे विविध जातींचे स्थलांतरीत पक्षी विनासायास दृष्टीस पडतात. खंड्या, समुद्र सताने, घुबड या पक्षांच्या दुर्मिळ जाती या भागात दृष्टीस पडल्याचे ते म्हणाले. दरम्यान, येथे खाडी किनारा, रेतीचे पठार आणि कांदळवन असल्याने स्थलांतरित पक्षांच्या निरीक्षणाची संधी उपलब्ध आहे.नियोजित विकासाची गरजपर्यटन स्थळ असलेल्या या तालुक्याला हे नवे दालन खुणावत असून त्याच्या विकासाकरिता नियोजित पद्धतीने काम झाले पाहिजे.पाणथळ जागांवर होणारी बांधकामे जैवविविधतेला धोका पोहोचवत असल्याने त्यांच्यावर कारवाईची गरज आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवVasai Virarवसई विरार