शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

गुप्त धनाचा हव्यास; मांडुळांची तस्करी करणाऱ्या शिवसेना नेत्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 3:34 AM

गुप्त धनाचा हव्यास : सरपंच, साथीदारही झाला गजाआड

पालघर/मनोर : गुप्त धनाचा शोधक समजल्या जाणाऱ्या दुर्मिळ जातीच्या मांडूळ ह्या बिनविषारी सापाच्या विक्री प्रकरणी पालघर पंचायत समितीचे माजी सभापती सुनील धानवा आणि माजी सरपंच असलेल्या त्याच्या साथीदारास स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून ताब्यात घेतले. ह्या प्रकरणी मनोर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जाणारा मांडूळ प्रजातीचा सर्प सध्या अंधश्रद्धाचा बळी पडत असून गुप्त धनाचा शोधक असल्याच्या अंधश्रद्धे आणि इतर गैरसमजुती मुळे ह्या बिनविषारी सापाची मोठी तस्करी राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे ह्या प्रजातीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला असून सर्वसामान्य माणूस त्याच्या जीवावर उठला आहे. तालुक्यातील मनोर पोलीस स्टेशन हद्दीतील पोचाडे गावात राहणाºया आरोपी सुनील धानवा यांच्या वाडीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी छापा टाकला.ह्यावेळी मांडूळ जातीचे दोन दुर्मीळ साप जप्त करण्यात आले. एका सापाचे वजन चार किलो आणि ५३ इंच लांब तर दुसºया सापाचे वजन एक किलो आणि लांबी ४१ इंच अशी आहे. दोन्ही मांडुळांची काळ्या बाजारातील किंमत सुमारे दीड कोटी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बेकायदेशीररित्या मांडूळ जातीचे साप बाळगल्या प्रकरणी सुनील धानवा आणि पवन भोया यांच्यावर मनोर पोलीस स्टेशन मध्ये वन्यजीव संरक्षण नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे.गुन्हा दाखल, मांडूळ सुरक्षितह्या सापाची पूजा केल्यास पैशाचा पाऊस पडतो तसेच काही दुर्धर आजारावर तयार करण्यात येणाºया औषधात ह्याचा वापर करण्यात येत असल्याचे सांगितले जाते. सुनील धानवा आणि त्यांचे सहकारी मासवण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पवन भोया ह्या दोघांनी बेकायदेशीर रित्या दोन साप जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी मांडुळ जप्त करून वनविभागाच्या ताब्यात दिले आहेत. वनविभागाच्या ताब्यातील मांडूळ डहाणूच्या वन्यजीव संरक्षण आणि प्राणी कल्याण संस्थेत ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी