तलासरी - तलासरी व डहाणू परिसरात भूकंपाचे वारंवार धक्के बसत असल्याने शाळा व इमारतींना तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. भविष्यामध्ये मोठा भूकंप होऊन संभाव्य जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत दोन्ही तालुक्यांमध्ये सकाळच्या सत्रात शाळा भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.भूकंपाच्या भीतीने शाळा उघड्यावर मंडपात भरविण्यात येत आहेत पण दुपारच्या प्रहरी उन्हाचा तडाखा बसत असल्याने त्याचा मुलांना त्रास होत असल्याने शाळा सकाळच्या वेळी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार बसणार या भूकंपाच्या धक्क्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या इमारतीमध्ये न बसवता वर्गाबाहेर सोयीच्या ठिकाणी बैठक व्यवस्था व सकाळचे शाळा सत्र भरवण्याची परवानगी तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव देण्यात आला होता.
त्यानुसार भूकंप प्रवण क्षेत्रातील शाळा सकाळच्या सत्रामध्ये भरवण्याची परवानगी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामध्ये डहाणू तालुक्यातील १७ गावात तर तलासरी मधील १० गावातील शाळांच्या यामध्ये समावेश असून येथे सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यात येणार आहेत. काही शाळा भूकंपप्रवण क्षेत्रात येऊनही ज्या शाळाची नावे नाहीत त्यांचे जिल्हापरिषदेकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी राहुल म्हात्रे यांनी दिली.भूकंपप्रवण क्षेत्रात येणारे गावपाडेतलासरी गट : १) सवणे :- सावरपाडा, पाटीलपाडा, वाडुपाडा २) वडवली :- बांगरपाडा, नवापाडा, डोंगरी पाडा, हाडळपाडा, ३ ) कारजगाव:- पाटिलपाडा, मानपाडा, नारलीपाडा ४) कवाडा :- ठाकरपाडा, पाटीलपाडा, आवारपाडा, ५) झरी :- पाटीलपाडा ६) वसा :- धामणपाडा ७) तलासरी :- विकासपाडा, हाडळपाडा, पारसपाडा ८) कुर्झे :- गावितपाडा, बोबीपाडा ९) उधवा :- ठाकरपाडा, जामुळंपाडा १०) डोंगरी :- विल्हातपाडाडहाणू गट : १) धुंदलवाडी :- धुंदलवाडी, पारली २) सायवन :- तालोटे, सायवन, पुंजावे ३) चिंचले :- चिंचले ४)नागझरी :- नागझरी, बोन्डगाव, ५) अबेंसरी :- अबेंसरी ६) गांगणगाव :- गांगणगाव , जितगाव ७) धामणगाव :- धामणगाव, कोमगाव, ८) बाहरे :- बाहरे, ब्राम्हणवाडी, घाढणे ९) वांकास १०) दापचरी ११) हळदपाडा:- हळदपाडा, खुबाळे, वरखंडे 12) मोडगाव :- मोडगाव, तोरणीपाडा 13) आंबोली :- आंबिवली तर्फे बहारे 14) शिसणे:- शिसणे पांढरतरागाव, करांजविरा 15) धानिवरी :- धानिवरी, दहीगाव, देऊर 16) ओसरवीर :- ओसरवीर, कादंरवाडी 17) विव्हळवेढे :- विव्हळवेढे, खाणीव, सोनाळे, आवढणी