शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वसईच्या केळीला आता शहापूरची टक्कर, लेनाडमध्ये प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 1:30 AM

शहापूर तालुका पाणीटंचाईचा म्हणून परिचित आहे. मात्र, आता त्याची ओळख केळ्यांची लागवड करणारा म्हणून नावारूपाला येणार आहे.

जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुका पाणीटंचाईचा म्हणून परिचित आहे. मात्र, आता त्याची ओळख केळ्यांची लागवड करणारा म्हणून नावारूपाला येणार आहे. ठिबक सिंचनाचा वापर करून केळीलागवडीचा प्रयोग यशस्वी झाला असून पैसा देणारे हे उत्पादन आहे.शहापूर तालुक्यातील लेनाड (बु) येथील कृषी तंत्र महाविद्यालयातील २५ एकर जागेत केळीची लागवड केली आहे. कृषी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष भगवान भोईर हे प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. फुलशेती, ग्रीनहाउस, वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याची पिके घेतली. ही शेती चांगल्या प्रकारे तालुक्यात रुजल्यानंतर याच विद्यालयात मागील वर्षी पपईची लागवड यशस्वी करून दाखवल्यानंतर केळीचे उत्पादन घ्यायचे भोईर यांनी ठरवले आणि हा प्रयोगही यशस्वी झाला. आपल्याकडे वसईची केळी अधिक प्रसिद्ध आहेत.केळीच्या लागवडीच्या प्रयोगाची जबाबदारी प्रभाकर भोईर, भैरव सोनावळे, प्राचार्य प्रकाश भांगरात, नरेंद्र वाघ, नितीन घुडे यांच्यासह १८० विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य त्यांनीच पुरविले आणि अपार मेहनत घेऊन तो प्रयोग यशस्वीही करून दाखवला. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून २५ एकर जागेत २३ हजार ६०० रोपांची लागवड म्हणजेच एकरी १२०० झाडांची लागवड केली. प्रत्येक झाडावर किमान ५०० रुपये उत्पन्न देणारे केळीचे ३० ते ३५ किलो वजनाचे घड तयार झाले असून खर्च वजा जाता एकरी सहा लाख रुपये पीक देईल, अशी अपेक्षा आहे. हे पीक २८ महिन्यांत घेता येत असून एकरी १० लाख रुपये इतके उत्पन्न देणारे ठरणारे आहे. केळ्यांची विक्र ी याच ठिकाणी केली जाणार असून जागेवरच व्यापारी येऊन ती घेऊन जाण्याची तजवीज केली जाणार आहे.ठिबक सिंचनाचा अवलंब केल्याने एकदा गर काढून ते झाड तोडून त्याला दुबार आलेल्या रोपांपासून असे तीन वेळा उत्पादन घेता येते. त्यामुळे ते शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरणार आहे. या पिकावर हवामानाचा कोणताच वाईट परिणाम होत नाही. ज्याज्या ठिकाणी पाणी आहे, त्यात्या ठिकाणी शेतकऱ्यांनी केळीचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन प्राचार्य भांगरत यांनी केले आहे.>कृषी तंत्र महाविद्यालयात केलेल्या शेतीतून अधिक फायदा होणार असून अशा प्रकारचे उत्पादन शेतकºयांनी घेतल्यास ते फायदेशीर ठरेल.- विलास झुंजारराव,कृषी अधिकारी