आसनगाव/भातसानगर : शहापूर नगरपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली. पहिल्याच नगरपंचायतीवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळवून शिक्कामोर्तब केले. मात्र, शासनाच्या यादीत शहापूर तालुका हा आदिवासी म्हणून गणला गेला आहे.आरक्षणादरम्यान नगराध्यक्षपद जर आदिवासी उमेदवारासाठी आरक्षित झाल्यास शिवसेनेकडे त्या संवर्गाचा उमेदवार नसल्याने शिवसेनेची पंचाईत होणार असून नगराध्यक्षपदावर पाणी सोडावे लागणार असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.शहापूर नगरपंचायतीचे १७ प्रभाग असून त्यामध्ये शिवसेनेचे १० उमेदवार, भाजपचे ३, राष्ट्रवादी पक्षाचे ३ आणि अपक्ष १ असे १७ उमेदवार निवडून आलेले आहेत. प्रभाग क्र . १ चे सुनील बांगड, प्रभाग क्र . २ रोशनी बुरसे हे दोन्ही अनुसूचित जमातीचे विजयी उमेदवार राष्ट्रवादी पार्टीचे असल्याने शिवसेनेकडे अनुसूचित जमातीचे उमेदवार नाही.
शहापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद कुणाकडे?
By admin | Published: November 04, 2015 10:56 PM