लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : अभिनेत्री तुनीषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी प्रियकर शिजान खान याला उद्या वालिव पोलिस वसई न्यायालयात हजर करणार आहेत.
तुनीषाने मालिकेच्या सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन शनिवारी दुपारी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी प्रियकर शिजान खानला अटक केली होती. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची कोठडी उद्या संपत असल्याने त्याला वसई न्यायालयात पुन्हा हजर करणार आहे. दरम्यान, दोन किंवा तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळण्याची शक्यता आहे.
‘लव्ह जिहाद’चा अँगल नाही
तुनीषा ही ‘अली बाबा’ मालिकेचा को-स्टार शिजान खानसोबत काही काळापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. ब्रेकअपनंतर तुनीषा अस्वस्थ होती. यामुळे २४ डिसेंबरला मेकअप रूममध्ये आत्महत्या केली. आतापर्यंत केलेल्या तपासात लव्ह जिहादचे एकही प्रकरण समोर आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच शवविच्छेदन आहवालात तुनीषासोबत बळजबरीचे कोणतेही चिन्ह नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"