तलवाडा: नगर जिल्ह्यात राहणारा मेंढपाळ समाज रोजंदारीसाठी व मेंढ्यांच्या व मेंढी खताच्या विक्रीसाठी विक्रमगड व परिसरात दाखल झाला आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही नगर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असून पोटापाण्यासाठी एका गावाहून दुसऱ्या गावी मेंढरांचे कळपच्या कळप व आमचा पूर्ण संसार घेऊन फिरत असतो. मिळेल त्या मोकळ्या जागेवर तात्पुरते झोपडे बांधून राहतो. आताच आम्ही जव्हार येथून आलो. विक्रमगड मुक्कामी राहून उद्या या गावातून काही रोजगार आणि मेंढरांना चांगली किंमत मिळाल्यास विक्री करून आमचा चरितार्थ चालवितो. हा मेंढरांचा कळप सर्वच आमच्या मालकीचा नसतो. त्यातील काही आमच्या मालकीची मेंढरे तर काही गावातील दुसऱ्यांचे पाळण्यासाठी, चाऱ्यासाठी आम्ही बरोबर घेतो व त्यांना पाळण्याकरिता अर्धा हिस्सा आम्हास दिला जातो़ अनेक शेतकरी मेंढ्यांच्या विष्ठेचे खत शेतीला देण्यासाठी या मेंढपालांना आपल्या शेतात मेंढ्या बसविण्यास सांगतात. त्याबदल्यात त्यांना पैसे दिले जातात. याचा दर दिवसावर ठरवलेला असतो. त्याच शेतात हे झोपडे बांधून राहतात.
नगरच्या मेंढपाळांचा विक्रमगडमध्ये मुक्काम
By admin | Published: December 21, 2015 1:11 AM