शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

विक्रमगडच्या बाजारपेठेत अजूनही शुकशुकाट

By admin | Published: January 23, 2017 5:13 AM

अजूनही या परिसतील एटीएम व बॅकांमध्ये पुरेसे चलन उपलब्ध होत नसल्याने विक्रमगड तालुक्यातील ९५ गावपाडयातून

विक्रमगड : अजूनही या परिसतील एटीएम व बॅकांमध्ये पुरेसे चलन उपलब्ध होत नसल्याने विक्रमगड तालुक्यातील ९५ गावपाडयातून जवळजवळ २० किलोमीटरहून आलेल्या खातेदारांना अदयापही अडचणींचा सामना करावा लागतो आहे़. बॅकांमधून आठवडयाला फक्त २४ हजार रुपये काढण्याचे निर्बंध आहेत. परंतु तेवढे चलन बँकात नसल्याने त्या देतील तेवढेच पैसे ठेवीदारांना स्वीकारावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांत संताप आहे, अदयापही ग्राहकांची मोठी गैरसोय होत असल्याने येथील बाजारपेठेतील मंदी अजूनही कायम आहे. सोमवार व बुधवार सोडले तर बाकीच्या दिवसांत बोहोणीसुध्दा होत नसल्याच्या तक्रारी व्यापारीवर्गाकडून होत आहेत़ याबाबत कॉग्रेस व राष्ट्रवादीने आंदोलन देखील केले मात्र अजूनही स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. याचा मोठा फटका नागरिंकाना व त्यामुळे व्यापारी वर्गाला बसतो आहे़दरम्यान जुना नोटांची मुदत संपून बॅकेत ग्राहकांच्या जुना नोटा बदलुन रक्कम खात्यावर जमा झाली आहे़ आता खात्यातून पैसे काढतांना आपण मागू तेवढ्या नविन नोटा मिळणार या आशेवर सर्वानीच आपल्या आपल्या गरजेच्या कामांना सुरुवात केली होती. यात घर दुरुस्ती, शेतीपंप दुरुस्ती, नवीन औजारांची खरेदी, औषधे, नविन घर बांधणी, शाळा, कॉलेजची फी, अशी अनेक महत्वाची जी कामे नोटा बंदीच्या काळात झाली नव्हती. ती आता होतील अशी ठेवीदारांची अपेक्षा होती ती फोल ठरली आहे. कित्येक नागरिकांना आजही बॅकांमध्ये तासनतास रांगा लाऊनही हातामध्ये तुटपुंजी रक्कम पडते आहे़ अजूनही याभागातील बॅकेमध्ये दुपारनंतर पैसे नसल्याने रिकाम्या हाती परतावे लागत आहे़नोकरदारांनी सांगीतले की, आम्हांस आजारपणाकरीता तसेच आॅपरेशन करीता पैशांची अत्यंत गरज आहे. आमच्या खात्यामध्ये पैसे देखील आहेत़ परंतु बॅकेकडे पैसे नसल्याने व आठवडयाकरीता फक्त २४ हजार रुपये काढण्याची मुभा असली तरी तेवढेही पैसे बँक देत नसल्याने पैसे कसे उभे करायचे? अशी मोठी अडचण आहे़ सर्वाचीच ही परिस्थीती असल्याने कुणाकडे उसनवारी मागितली तर त्याचेजवळ देखील रोख रक्कम नसल्याने अडचणीमध्ये अजूनही भर पडत आहे़आदिवासी व दुर्गम भागात असलेल्या विक्रमगड या भागातील सामान्य माणूस आदिवासी, अशिक्षीत शेतकरी, शेतमजूर, अजूनही गोंधळला आहे़ कारण त्याच्याकडे जी काही तुटपूंजी रक्कम जमवली आहे़ ती त्यांनी बँकेत भरलेली आहे व ती रक्कम अडीअडचणींमध्ये उपयोगी यावी करीता त्याची आजही धडपड चालू त्यामुळे सर्वच बँकामध्ये आजही गर्दी आहे. सकाळपासून ते सायंकाळपर्यत गर्दी कायम आहे, त्यात आदिवासी स्त्री-पुरुषांची संख्या जास्त दिसते़ (वार्ताहर)