शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

वाढवण बंदराबाबत शिवसेना दुतोंडी

By admin | Published: August 11, 2015 11:42 PM

डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराला शिवसेनेचा पूर्णपणे ठाम विरोध असल्याचे सेनेचे संपर्क प्रमुख अनंत तरे यांनी जाहीर केले असताना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी वाढवण बंदर होणारच

पालघर : डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराला शिवसेनेचा पूर्णपणे ठाम विरोध असल्याचे सेनेचे संपर्क प्रमुख अनंत तरे यांनी जाहीर केले असताना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी वाढवण बंदर होणारच असे ठाम मत व्यक्त केले आहे. शिवसेनेच्या दुटप्पी धोरणाबाबत डहाणू, पालघर तालुक्यातील किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छीमार, शेतकरीवर्गासह तरूणवर्गामधून सोशल मिडीयावरून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. तरूणांनी व्हाट्सअप, फेसबुक वर सेनेच्या दुटप्पी धोरणावर सडकून टीका करीत वाढवण बंदरासाठी पहिल्या टप्प्याच्या सर्व्हेक्षणाला मोठ्या प्रमाणात विरोध करणार असल्याचे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी लोकमतला सांगितले. डहाणू तालुक्यातील नियोजित वाढवण बंदराचा सर्वाधिक फटका मच्छीमार समाजासह बागायतीक्षेत्राला बसणार आहे. ओएनजीसीने समुद्रात तेलविहीरी निर्माण केल्याने मासेमारी क्षेत्रात घट निर्माण झाली आहे. त्यातच या बंदराच्या उभारणीमुळे मालवाहू जहाजाच्या वर्दळीचा मोठा विपरीत परिणाम मासेमारी व्यवस्थापनावर होऊन प्रदूषणाद्वारे मत्स्यबीज नष्ट होणार आहे. तसेच शेवंड, दाढा, घोळ, कोत इ. आर्थिक उत्पन्न देणाऱ्या माशाच्या पिल्लांचे संवर्धन इथे मोठ्या प्रमाणात होत असल्याने भाग माशांचा गोल्डन बेल्ट म्हणून सर्वत्र ओळखला जातो. तसेच प्रभु श्रीरामचंद्राने आपल्या वडीलांचे पिंडदान केल्याने या ऐतिहासिक स्थळाचे पावित्र नष्ट होणार असल्याने लोकांच्या धार्मीक भावना दुखावल्या आहेत.पालघर येथे ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघाने २४ जून २०१५ रोजी पालघर येथे वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या मच्छीमारांच्या बैठकीमध्ये पालघर जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनंत तरे यांनी येऊन सेना कार्याध्यक्ष उध्वव ठाकरे यांचा हवाला देऊन वाढवण बंदराला सेनेचा पूर्णपणे विरोध राहील असे घोषित केले होते. ही घोषणा विरते न विरते तोच सेनेचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधानपरिषदेत वाढवण बंदर होणारच असे घोषित करून संपर्क प्रमुखांच्या घोषणेला किंमत नसल्याचे सिद्ध केले.पालघर विधानसभेची पोट निवडणूक लवकरच जाहीर होणार असल्याने मताच्या गठड्यावर डोळा ठेवून संपर्क प्रमुख अनंत तरे यांनी मच्छीमारांची सहानुभूती मिळावी यासाठी ही घोषणा केल्याचे सत्य सर्वांसमोर उघडे झाले आहे. ज्या वाढवण बंदराला १९९८ मध्ये उद्धव ठाकरे, आनंद दिघे या सेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी भेट देत विरोध केला होता. तसेच ज्या पवित्र ऐतिहासिक स्थळावर सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिंचे विसर्जन करण्यात आले ते पवित्र स्थळ उध्वस्त करण्याला शिवसेनेचा पाठींबा असल्याने अनेक वर्षापासून शिवसेनेची भिंत अभेद्य ठेवणारा कडवट शिवसैनिकही खवळला आहे. (वार्ताहर)