ठाणे : महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या वादाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. शिवसेनेने आयुक्तांचा वापर करून घेतला असून आता त्यांच्या मर्जीप्रमाणे कामे होत नसल्यानेच त्यांनी आयुक्तांविरोधात भूमिका घेतली असल्याचा धक्कादायक आरोप राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केला. त्यामुळे शिवसेनेच्या या घाणेरड्या राजकारणाचा बळी आम्ही होणार नसल्याचे स्पष्ट करून आमचा पाठिंबा हा यापूर्वीही विकासाला होता आणि यापुढेही तो राहील, असे सांगून शिवसेनेची कोंडी केली.दोन दिवसांपासून आयुक्त विरुद्ध लोकप्रतिनिधी असा वाद सुरू आहे. आयुक्तांना हटवण्यासाठी अविश्वास ठरावही मंजूर केला. परंतु, त्यानंतर आता राष्टÑवादीने अचानक आपली भूमिका बदलून थेट सत्ताधारी शिवसेनाच याला जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
यापूर्वीसुद्धा आम्ही खाडीतील शुद्ध पाण्याचा प्रकल्प, संकरा नेत्रालयाला विरोध केला होता, जे प्रस्ताव योग्य नाहीत, अशा सर्वच प्रस्तावांना आमचा कालही विरोध होता, तो आजही तसाच कायम असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. वरिष्ठांकडून आलेले चुकीचे प्रस्ताव मंजूर करून घेण्यात सेनेला अडचणी आल्यानेच त्यांनी आयुक्तांवरच निशाणा साधल्याचे ते म्हणाले. आयुक्तांना शिवसेना चालवत असून त्यांचा चुकीच्या कामांमध्ये उपयोग होत नसल्याने त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होतो आहे असा आरोप केला. स्थायी, स्वीकृतच्या निवडणुकीतही त्यांनी आयुक्तांना बाजूने बोलण्यास भाग पाडल्याचेही त्यांनी सांगितले.‘ते’ गरज पडल्यास आयुक्तांच्या पाया पडतातनामंजूर केलेल्या विषयांना पाठिंबा त्यांच्या पक्षातील नगरसेवकांनी दिला आहे. आव्हाड हे त्यांच्या नगरसेवकांच्या बाजूने आहेत की विरोधात, हे स्पष्ट करावे. पक्षाची गळती आधी रोखावी, मग शिवसेना काय करते आणि काय नाही करत, याचा विचार करावा. एखादा प्रस्ताव मंजूर करायचा असेल, तर त्यासाठी आमच्याकडे संपूर्ण बहुमत आहे. आव्हाडांच्या पाठिंब्याची आम्हाला गरज नाही. - नरेश म्हस्के, सभागृह नेते, ठामपाशिवसेना एका भूमिकेवर आजपर्यंत केव्हाच ठाम राहिलेली नाही. गरज पडली तर ते आयुक्तांचे पायही धरतात आणि गरज सरली की, ते त्यांच्याविरोधातही बोलतात. ज्युपिटरच्या प्रस्तावाबाबत कोण कोणाला भेटले, कुठे कोणत्या प्रस्तावावर चर्चा झाली, याची सर्व माहिती आम्हाला आहे, वेळ आली की ती दिली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सहासहा दिवस एक महासभा सुरू ठेवण्यामागे आपली प्रकरणे मंजूर करून घेणे हा हेतू असतो. एखाद्या प्रकरणात खोडा आला, तर महासभा लांबवली जात असल्याचा आरोप राष्टÑवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. महासभेत केवळ अधिकाऱ्यांनी आपल्या बाजूने खोटे बोलावे, पण रेटून बोलावे, एवढीच अपेक्षा शिवसेनेची असल्याचेही त्यांनी सांगितले.