डहाणू : शहराच्या विकासावर बोलतांना बुधवारी शिवसेनेच्यावतीने स्मार्ट डहाणूचा वादा करण्यात आला. येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून आमदार रविंद्र फाटक यांनी गयारामांचा समाचार घेतांना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करुन मतदारांसाठी आम्ही नवे चेहरे देत असल्याचे सांगितले.या शहराचा खºया अर्थाने विकास झालाच नाही. ज्या विकासकामांचा दावा केला जातोय त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्यांना मतदार राजा त्यांची जागा दाखवेल असा टोला ही त्यांनी लगावला. भ्रष्टाचाºयांविरुद्ध शिवसेनेने दोन हात करु न उभी असून संतोष शेट्टी हा नगराध्यक्षपदासाठी नवा चेहरा देत आहोत. सेनेचा विश्वासघात करणाºयांना जागा दाखवा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. सेनेला संधी दिल्यास स्मार्ट डहाणू बनवून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार अमित घोडा, प्रभाकर राऊळ, तालुका प्रमुख संतोष वझे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष शेट्टी व नगरसेवकपदाचे उमेदवार उपस्थित होते. या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी २५, भाजपा २४ तर शिवसेना २४ जागा लढवित आहेत तर काँग्रेस २०, बविआ १५ जागा लढत आहे. सीपीएमने पाच जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील.जव्हारमध्ये सर्वच पक्षांचा जोरदार प्रचारजव्हार : येथील नगर परिषदेसाठी प्रचाराची राळ उठली असतांना मंगळवारचा दिवस ओखी चक्रीवादळामुळे वाया गेला या पार्श्वभूमिवर बुधवारी सर्वच पक्ष, अपक्ष व जव्हार प्रतिष्ठानच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला.यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस व जव्हार प्रतिष्ठानकडून शक्तीप्रदर्शनच करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादीतर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या सभेनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही सभा होणार आहे. त्याकडे लक्ष लागले आहे.वाडा : नगरपंचायतीची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षांचे उमेदवार मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. विरोधी उमेदवारापेक्षा आम्ही कसे सरस आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. मतदाराराजाला आकर्षित करण्यासाठी त्यांनी घरो घरी प्रचार सुरु केला आहे. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीत ताकदीनिशी उतरले असून भाजप, शिवसेना यांनी सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, बहुजन विकास आघाडी व मनसे यांनी काही जागांवर उमेदवार उभे केले असून प्रचाराला सुरु वात केली आहे.बविआने आपला विकासनामा जाहीर केला असून यात तलावपाळीच्या धर्तीवर तलाव सुशोभीकरण, छत्रपतींचे आश्वारूढ स्मारक, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. आंबेडकर स्मारक, एमजीपी नळपाणी योजना व वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट, विहीरीची स्वच्छता व पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, सुसज्ज रस्ते व उद्याने, सुरळीत वीज पुरवठा, गरीबांना परवडेल अशी आरोग्य सेवा, वाहतूक कोंडीवर उपाययोजना, टपरीधारकांना हक्काचे गाळे, आदिवासींचे जीवनमान उंचावणे, वनहक्क दाव्याचा निपटारा, सुसज्ज बाजारपेठ इमारत, स्थानिकांना रोजगारात प्राधान्य, प्लास्टिक मुक्त शहर, मोकाट गुरे व भटकी कुत्री यांचा बंदोबस्त करू अशा आश्वासनांची बरसात करण्यात आली आहे.
शिवसेनेकडून स्मार्ट डहाणूचा वादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:10 AM