- सुरेश काटेतलासरी - पालघर लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तशी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच गुरु वारी वनगा कुटुंबियांनी मातोश्रीवर जाऊन हाती शिवबंध बांधल्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चाना उधाण आले आहे. ज्या वनगांनी भाजपाबद्दल अखेर पर्यंत निष्ठा राखली त्या पक्षाच्या श्रेष्ठींनी त्यांच्या कुटूबियांना भेटीची वेळही दिली नसल्याने पालघर भागामध्ये नाराजीचे सूर आहेत.याबाबत वनगा कुटुंबीयांनी खंत व्यक्त करुन शिवसेनेत प्रवेश केला मात्र, दुसरीकडे भाजपाने त्यांचा शिवसेना प्रवेश अमान्य ठरवत वनगा कुटूंबियच पक्षापासून दोन हात लांब राहण्याचा प्रयत्न करत आहेत असे वक्तव्य भाजपा जिल्हाध्यक्ष आ. पास्कल धनारे यांनी म्हटले आहे. यात पक्षाची भूमिका अद्यापही स्पष्टपणे नसली तरी सर्वानुमते उमेदवारी त्यांनाच मिळणार होती असे एकंदरीत चित्र असताना श्रीनिवास हे मातोश्री वर उमेदवारी दिल्यास सहकार्य करावे यासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. मात्र श्रीनिवास वनगा यांच्याकडून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असल्याचे सांगत पक्षाने वनगा यांच्या निधनानंतर विचारपूस केली तर नाहीच म्हणत वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करीत भाजपला रामराम ठोकल्याचे सांगितले. वनगा सुपुत्राने केलेल्या जाहीर प्रवेशानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असून भाजपातील स्थानिक नेत्यामधील दुटप्पीपणा उघड झाला आहे.वनगा कुटुंबीयांचा बोलका सवाल...- गोपीनाथ मुंडे, कृष्णा घोडा यांच्या निधनानंतर पक्षांतर्फे कुटुंबातील उमेदवार देण्याचा लगेचच निर्णय घेतला होता मग, वनगा यांच्या निधनानंतरच या निर्णयाचे घोडे नेमके कुठे अडले हा वनगा कुटुंबीयांचा सवाल बोलका आहे. पक्षाने जाणूनबुजून घराणेशाही मोडून काढण्यासाठी तर हा निर्णय घेतला नाही ना?अशी चर्चा मात्र आता रंगत आहे.-तलासरीतील राजकीय घडामोडिंना मात्र वेग आला असताना शिवसेना नेते कायकर्ते यांनी वनगा यांच्या घरी जाऊन भेटी घेण्याचा सपाटा लावला आहे. वनगा यांच्या शिवसेना आमदार अमित घोडा, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, समीर सागर, प्रभाकर राऊळ, नीलम म्हात्रे महिला संघटक व इतर पक्ष कार्यकर्त्यांनी भेटीगाठी घेतल्या.