शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

धक्कादायक वास्तव :निर्बीजीकरण केंद्रात रेबीजग्रस्त श्वान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 4:06 AM

वसई-विरार शहरातील भटक्या श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी महानगरपालिकेचे श्वान निर्बीजीकरण केंद्राद्वारे आॅक्टोबर २०१८ पर्यंत अंदाजे २४,२५० हजारांच्या आसपास श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा करण्यात आला आहे

वसई : वसई-विरार शहरातील भटक्या श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी महानगरपालिकेचे श्वान निर्बीजीकरण केंद्राद्वारे आॅक्टोबर २०१८ पर्यंत अंदाजे २४,२५० हजारांच्या आसपास श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव सुरुच आहे. गत आठवड्यात या निर्बीजीकरण केंद्रात पाच श्वानांचा भुकेमूळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, निर्बीजीकरणासाठी आणण्यात आलेल्या श्वानांसोबत रॅबीजग्रस्त श्वानही येथेच कोंबल्याची धक्कादायक माहिती प्राणिमित्रांकडून सांगण्यात आली. याबाबत सदर केंद्रचालकाविरोधात तक्र ार करुनही पोलिस कारवाई होताना दिसत नाही.महापालिकेच्या अधिकृत नोंदीनुसार शहरात सध्या ३५ हजारांहून अधिक भटकी श्वान आहेत. पंरतू हा आकडा ७०,००० असल्याचे सांगण्यात येते. महापालिकेकडे नवघर पूर्व येथे एकमेव श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. त्यात दररोज १५ ते २० श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते. परंतु हे केंद्रही आता अपुरे पडत आहे. या केंद्रात गेल्या आठवड्यात पाच श्वानांचा भुकेमूळे मृत्यू झाल्याचा आरोप प्राणिमित्र संघटनेकडून करण्यात आल्यामुळे हे निर्बीजीकरण केंद्र प्रकाशात आले होते.या मृत पाच श्वानांपैकी दोन श्वानांचे मृतदेह परळ केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवून आठवडा उलटला तरी अजून अहवाल आला नाही. याबाबत अधिक माहिती घेतली असता शवविच्छेदनासाठी पैसे कोण खर्च करणार हा प्रश्न समोर आला आहे. केंद्रचालक म्हणतात की, हा खर्च आंम्ही करणार नाहीत, प्राणिमित्र संघटनेवाले सांगतात की, हा खर्च महानगरपालिकेने करायला हवा. तर पोलिस प्रशासन मुग गिळून गप्प बसले आहेत.हा वाद सुरू असतांना आता प्राणिमित्र संघटनांनी नवीन विषयाला वाचा फोडत या निर्बीजीकरण केंद्राची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.दोन दिवसांपूर्वी प्राणिमित्र संघटनेचे कार्यकर्ते निर्बीजीकरण केंद्रात गेले असता केंद्रचालकाने विजीटर्सची वेळ संपल्याची सांगत त्यांना प्रवेश नाकारला होता. मात्र प्राणिमित्र संघटनांनी रजिस्टर नोंदवही तपासली असता, वहितील काही पाने फाडली गेल्याचे निदर्शनास आले होते. याच वेळी निर्बीजीकरण केंद्रात आणलेल्या श्वानांसोबत असलेल्या एका लहान वयाच्या श्वानाबद्दल माहिती घेतली असता तो श्वान २५ ते ३० लोकांना चावल्यामूळे तो रेबीजग्रस्त असावा अशी शंका डॉक्टरांना वाटत असतानाच तो अचानक मृत्यूमुखी पडला. त्यामूळे तो श्वान रेबीजग्रस्त होता, तसेच त्याला निर्बीजीकरणासाठी आणलेल्या इतर श्वानांसोबत कसे ठेवू शकता असा प्रश्न त्यांनी केंद्रचालक दगडू लोंढे यांना विचारला. मात्र, याबाबत त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे प्राणीमीत्रांनी माणिकपूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्र ार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र, अजूनही पोलिसांनी तक्र ार दाखल केलेली नाही. मृत रेबीजग्रस्त श्वान उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.कागदपत्रे सादर करा महापालिका खर्च देईल!आता प्राणीमीत्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपण हा शवविच्छेदनाचा खर्च केल्याचे सांगितले आहे. याबाबत प्रभारी सहाय्यक आयुक्त सुखदेव दरवेशी यांनी प्राणीमीत्रांनी याबाबत कागदपत्रे सादर करावी, पालिका खर्च देईल असे सांगितले आहे.या निर्बीजीकरण केंद्रात तीन ते चार महिन्यांच्या छोट्या श्वानांच्या पिल्लांवरही नसबंदी शस्त्रक्रीया करण्यात येत असल्याचा आरोप प्राणी मित्रांनी केला असून नवघर पूर्व येथे असणाऱ्या या निर्बीजिकरण केंद्राच्या चौकशीची मागणी केली आहे.रोगी व जखमी श्वानांसाठी निर्बीजीकरण केंद्रात वेगळा वॉर्ड बनविण्यात यावा अशी केंद्र चालकाची मागणी आहे. प्राण्यांची शिरगणती सुरू आहे. अहवाल आल्यानंतर शहरात किती श्वान आहेत याचा अंदाज येईल. प्रास्तावित इतर दोन निर्बीजीकरण केंद्र सुरू झाल्यावर शहरातील श्वानांच्या वाढत्या संख्येवर आळा बसेल.- सुखदेव दरवेशी,प्रभारी सहाय्यक आयुक्तया निर्बीजीकरण केंद्रातील सर्वच व्यवहार संशयास्पद आहे. रेबीजग्रस्त श्वान व नसबंदी करण्यासाठी आणलेले श्वान एकाच वॉर्डमध्ये ठेवले जातात. वयाने लहान श्वानांवरही नसबंदी शस्त्रक्रीया केली जात असल्याचा संशय आहे. पोलिसही सहकार्य करीत नाहीत.- मितेश जैन, अ‍ॅनीमल वेल्फेअरबोर्ड आॅफ इंडिया, सदस्य

टॅग्स :Vasai Virarवसई विरार