विरार : वसई तालुक्यातील वीज ग्राहकाना सध्या महावितरणच्या फॉल्टी मीटरचा शॉक बसत असून त्यामुळे प्रचंड अवाजवी बिलांचा भुर्दंड बसतो आहे. भरमसाठ बिले येण्याल्या महावितरणने पुरविलेले सदोष विद्युत मीटर कारणीभूत आहे. वसई विरार परिसरात दोन लाख सदोष विद्युत मीटर असल्याने ग्राहकांना ज्यादा बिलाचा बोजा सहन करावा लागत आहे.वसई तालुक्यातील वीज ग्राहकांच्या घरातील जुने विद्युत मीटर २०१३ -२०१४ साली बदलण्यात आली. हे मीटर फ्लॅश कंपनीचे होते. विशेष म्हणजे कोणतीही मागणी नसताना हे मीटर बदलण्यात आले. ते सदोष असून त्यांच्या वापरामुळे ज्यादा बिले येतात. असा आरोप लोरेल डायस यांनी केला आहे. सध्या वसई विभागात पन्नास हजार, नालासोपारा विभागात दीड लाख सदोष मीटर आहेत. ते अद्याप बदलण्यात आलेले नाहीत.ज्यादा बील येण्यचा मुद्दा पेटू लागल्याने २६ जुलै २०१६ रोजी अधिक्षक अभियंत्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सदोष मीटर बदलण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते. अद्याप त्याबाबत कोणताही कारवाई महावितरणने सुरू केलेली नाही तसेच ती कधी सुरू होईल याबाबतचा खुलासा देखील केलेला नाही. त्यामुळे ग्राहकांना लुटण्यातच महावितरणचा प्रयत्न आहे की, काय असा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण झाला आहे. यामुळे वीज ग्राहकांत संताप खदखदतो आहे. (प्रतिनिधी)महावितरणने सर्व आरोप फेटाळलेयाबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता अरु ण पापडकर यांच्याशी संपर्क केले असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून स्पष्ट केले की, सदोष मीटर आहेत हे खरे आहे. पण त्यांची संख्या खूप कमी आहे. आमच्याकडे दर आठवड्याला नवीन मीटर येत असतात. ते आम्ही सम प्रमाणात सर्वत्र वाटप करीत आहोत. शिवाय आमच्याकडे १० कनिष्ठ अभियंत्यांची संख्या रिक्त आहे. म्हणून विलंब होता आहे.बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे याबाबत तक्र ारी प्राप्त झाल्याने त्यांनी सर्व प्रभागात विद्युत समस्या जाणून घेण्यासाठी नगरसेवकांना शिबीर घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक नागरिकांच्या वीज आणि तिची बिले याबाबत समस्या जाणून घेऊन ३ मे २०१७ रोजी त्याचा आढावा घेण्यात येणार आहे.
लाखो वीज ग्राहकांना फॉल्टी मीटरचा शॉक
By admin | Published: May 01, 2017 5:43 AM