शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

‘दादागिरी करणाऱ्यांना तेव्हाच गोळ्या घालायला हव्या होत्या’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 1:01 AM

प्रदीप शर्मा यांनी केलेले सर्व एन्काऊंटर बनावट असून ते सुपाºया घेऊन केले असल्याचा आरोप केला.

नालासोपारा : मुंबईत ३५ वर्षे मी चोर आणि पोलीस खेळलो आहे. दादागिरी करणाऱ्यांवर दादागिरी करण्याचा आदेश मला देण्यात आला होता. मुंबईची दादागिरी संपवून दाऊदला पाकिस्तानला पळवून लावले. मात्र, एक चूक आमच्याकडून झाली, की आम्ही कधीही वसई - विरारमध्ये लक्ष दिले नाही. येथे दादागिरी करणाºयांवर जर तेव्हाच दोन गोळ्या घातल्या असत्या तर, आज येथील नागरिक सुखी झाले असते, असे वक्त व्य नालासोपारा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी विरारमधील जाहीर सभेत केले. आ. हितेंद्र ठाकूर यांनी त्यांना प्रत्त्युत्तर देताना, प्रदीप शर्मा यांनी केलेले सर्व एन्काऊंटर बनावट असून ते सुपाºया घेऊन केले असल्याचा आरोप केला.

विरारच्या फुलपाडा परिसरात रविवारी प्रदीप शर्मा यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेमध्ये उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, उत्तर प्रदेशचे खा. सत्यपाल सिंग, भाजपचे महाराष्ट्र सदस्य आर.एन.सिंह हे उपस्थित होते. दरम्यान, शर्मा यांच्या वक्त व्याचा समाचार घेताना आ. हितेंद्र ठाकूर यांनी ‘बंदुकीच्या दोन गोळ्या म्हणजे यांची वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे का?’, असा सवाल केला. जॉली एलएलबी पार्ट २ या चित्रपटात ३४ कोटींचा घोटाळा करणाºया भ्रष्ट अधिकाºयाची व्यक्तिरेखा प्रदीप शर्मांवर आधारित असल्याचा टोलाही त्यांनी हाणला.

मुंबईमधील नामांकित गुंड तडीपार झाल्यावर वसई - विरारमध्ये येत होते. त्यामुळे त्यांना तेव्हाच गोळ्या घालायला हव्या होत्या, असे मी म्हणाल्याचे प्रदीप शर्मा म्हणाले.

सेनेच्या बड्या नेत्यावर आरोपपालघर/मनोर : ठाण्यातील शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने आपणास ठाण्यातून गुंड आणून मारहाण करण्याबाबत एका बैठकीत सांगितले असल्याचा आरोप भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार संतोष जनाठे यांनी केला आहे. मात्र, आपण भूमिपुत्र असून अशा धमक्यांना भीक घालत नसल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.बोईसर मतदारसंघात भाजपचे बंडखोर संतोष जनाठे हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. भाजप पदाधिकाºयांनीही राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजप माझ्यासोबत नाही. केवळ माझ्यावर वैयक्तिक प्रेम करणारे भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी माझ्या प्रचारात आहेत, असे जनाठे यांनी यावेळी स्पष्ट केले.

विक्र मगडमध्ये चुरशीची लढत?विक्रमगड : मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघात बदललेल्या राजकीय समीकरणामुळे विक्र मगडचा गड कोण काबीज करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. यावेळी १० उमेदवार रिंगणात आहेत.विक्र मगड, जव्हार, मोखाडा आणि वाड्याचा काही भाग मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. अनुसुचित जमातीसाठी राखीव असलेला हा विक्रमगड मतदारसंघ काबीज करण्यासाठी राजकीय पक्षांसह अपक्षही मोठ्या ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. विक्रमगडमधील २ लाख ६४ हजार १३२ मतदारांमध्ये १ लाख ३३,७५३ पुरूष तर १ लाख ३० हजार ३७९ महिला मतदारांचा समावेश आहे. २०१४ च्या तुलनेत यावेळी या मतदार संघात नव्याने मतदारांची भर पडली असून शहरी आणि ग्रामीण अशी मत विभागणी होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यातही ग्रामीण भागात कमी मतदान होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Pradeep Sharmaप्रदीप शर्माShiv SenaशिवसेनाHitendra Thakurहितेंद्र ठाकूर