शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

वाडा येथील महावितरणवर श्रमजीवी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 4:00 AM

विजेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज श्रमजीवी संघटनेने महावितरणच्या वाडा कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवला. सर्वप्रथम खंडेश्वरी नाका येथून मोर्चा काढण्यात आला. त्याचे रूपांतर महावितरण कार्यालयासमोर सभेत झाले.

वाडा : विजेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज श्रमजीवी संघटनेने महावितरणच्या वाडा कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवला. सर्वप्रथम खंडेश्वरी नाका येथून मोर्चा काढण्यात आला. त्याचे रूपांतर महावितरण कार्यालयासमोर सभेत झाले. या मोर्चाचे नेतृत्व श्रमजीवीचे जिल्हा प्रमुख किशोर मढवी, संघटक सरिता जाधव, तालुका अध्यक्ष जानु मोहनकर यांनी केले.या तालुक्यामधील अनेक गाव पाड््यातील विजेची कामे गेली तीन चार वर्षापासून प्रलंबित आहेत. श्रमजीवी संघटनेने अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही महावितरण प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने संतापलेल्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारला. विशेष म्हणजे आज दुपारचे जेवणही मोर्चेकºयांनी महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात शिजवून खाल्ले. यावेळी आदिवासी कष्टकरी ढोर नाय माणूस हाय माणूस हाय, कोणाची भिक नको हक्क हवा हक्क हवा, कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय, अशा घोषणा दिल्या. यात श्रमजीवी संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष मिलिंद थुले, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पराड ,सहसचिव मनोज काशिद, संघटक बाळाराम पाडोसा ,कैलास तुंबडा आदी नेत्यांसहे कार्यकर्ते सहभागी होते. विजेची कामे तत्काळ सुरू करण्यात आल्याची माहिती सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार यांनी मोचेॅकरांना दिल्यानंतर मोर्चा समाप्त करण्यात आला. डोंगरपाडा (नेहरोली )येथील विद्युत वाहिनी सुरू करावी. वळवीपाडा, गोंडपाडा येथे ट्रान्सफॉर्मर बसवून लाईट चालू करावे. डोंगरीपाडा तुसे येथे विद्युत वाहिनी उभारावी गावदेवी पाडा घोडमाळ येथे १५व रानशेत येथील पाच विजेचे अवचित पाडा व परिसरातील २० मंजूर खांब उभारावेत.पोलिसांशी बाचाबाचीआंदोलनकतेॅ येत असताना महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चा नेण्यास मज्जाव केला. पोलिसांनी मोर्चा प्रवेशद्वाराच्या बाहेरच मोचेॅकरांना थांबण्यास सांगितले. मात्र आंदोलनकतेॅ थेट प्रांगणात आले. त्यानंतर कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली.डहाणूतील वीजपुरवठ्याचा बोजवाराडहाणू/बोर्डी: मान्सूनच्या आगमनापूर्वीच मागील आठवड्यापासून तालुक्यात विजेचा बोजवारा उडाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज गायब झाल्यानंतर उपकेंद्राशी संपर्क साधल्यावर फोन उचलला जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एखाद्या परिसरात रात्री वीज गेल्यास पुरवठा पूर्ववत व्हायला दुपारपर्यंतची वाट पहावी लागते.रात्रीच्या वेळी काम करताना टॉर्च नसल्याने गैरसोय होते, या बाबत वरिष्ठांना सांगूनही समस्या सुटत नसल्याचे रात्री काम कसे करावे असे कर्मचारी खाजगीत बोलतात. तर फ्यूज, वायर आणि तत्सम साधनांचा अभाव असल्याने छोटे काम करण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अनेक गावात वीजेचे जीर्ण खांब आणि तारा बदलण्यात आलेल्या नाहीत.तथापि निष्कारण विजेविना गैरसोय तसेच जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. किनाºयानजिकच्या गावांमध्ये जोराच्या वाºयामुळे विद्युत तारा तुटण्यासह अनेक समस्यांना तोड द्यावे लागत असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे. या समस्यांचे लवकर निराकरण न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील, त्यांचा अंत पाहू नका अशी तीव्र भावना नरपड येथील वीजग्राहक सचिन राऊत यांनी व्यक्त केली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणVasai Virarवसई विरार