शौकत शेखडहाणू : तालुक्याच्या सागरी किनापट्टीवर गेल्या सहा, सात वर्षापासून प्रचंड महागाई, डिझेल, बर्फाचे वाढते दर तसेच खलाशांची वाढीव मजूरी बरोरच पर्ससीन नेट पध्दतीमुळे मत्स्य व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याने मत्स्यदुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण होऊन पारंपरिक पध्दतीने मासेमारी करणारे हजारो मच्छीमार हवालदिल झाल्याने डहाणू व परिसरातील शेकडो तरुणांनी सुरक्षित मच्छिमारीचा पर्याय निवडला त्यातूनच कोळंबी शेतीत आपले नशीब आजमाविले परंतु शासनाने कोळंबी शेतीसाठी दिलेल्या जमीनीचा विकास करतांना स्थानिक ग्रामस्थांचा विरोध होऊ लागल्याने असंख्य कोळंबी शेतीची कामे अर्धवट स्थितीत असतांनाच शासनाने मंजूर करण्यात आलेल्या जमीनीचे शर्तीचा भंग केल्याच्या नोटीसा पाठवून जमीनी खालसा करून सरकार जामा का करण्यात येऊ नये असे आदेश काढल्याने कोळंबी करणाºया सुशिक्षित मच्छिमार तरूणामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.जिल्हयातील शासकीय खांजणपड जागा स्थानिक मच्छिमार व भूमिपूत्रांनी शासनाकडून भाडेतत्वार घेऊन सुधारीत तंत्रज्ञान पध्दतीने कोळंबी संवर्धन सुरू केले आहे. डहाणू तालुक्यातील वडकून मानफोडपाडा, चिंचणी, वरोर, वाणगांव, आगवन, लोणीपाडा, बाडा पोखरण, चिखला, चंडिगाव, आसानगांव इत्यादी गावांत सुमारे दिडशे कोळंबीशेती संवर्धनकारक आहे . येथे दर सहा महिन्याला टायगर तसेच व्हेनामी कोळंबी शेती उत्पादित केली जाते. येथील मच्छीमार तरूण रात्र दिवस मेहनत करून पाच सहा महिन्यांनी त्याचे उत्पन्न घेत असे. उत्पादित कोळंबी वीस, पंचवीस, पन्ना ग्राम झाल्याने मुंबई गुजरात राज्यातील मोठे व्यापारी कोळंबी खरेदी करण्यासाठी येत असतात. शिवाय डहाणूची कोळंबी परदेशात प्रसिद्ध आहे. शिवाय डहाणूची कोळंबी निर्यात केली जात असल्याने त्या निमित्ताने देशाला मोठया प्रमाणात परकीय चलन प्राप्त होते. त्यामुळे येथील उच्चशिक्षित मच्छिमार तरूण शासकीय नोकरीवर अवलंबुन न राहता पारंपरिक मासेमारी बरोबरच जोडधंदा म्हणून कोळंबी शेतीचा व्यवसाय स्विकारला आहे.
कोळंबी प्रकल्पधारकांची मुस्कटदाबी, शासकीय धोरणाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 12:27 AM