शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सरकार-समितीत संघर्षाची चिन्हे

By admin | Published: October 07, 2016 4:39 AM

सरकारने एका बाजूला वाढवण बंदर उभारण्याचा घाट घातला असला तरी दुसऱ्या बाजुला डहाणू च्या पश्चिम किनारपट्टी वरील २५ ते ३० गावातील हजारो मच्छीमार

शौकत शेख / डहाणूसरकारने एका बाजूला वाढवण बंदर उभारण्याचा घाट घातला असला तरी दुसऱ्या बाजुला डहाणू च्या पश्चिम किनारपट्टी वरील २५ ते ३० गावातील हजारो मच्छीमार ,शेतकरी ,बागायतदार ,डायमेकर्स यांना उध्वस्त करणार्या या बंदराच्या सर्व्हेला विरोध करण्यासाठी परिसरातील हजारो लोक आक्रमक झाल्याने ,वाढवण बंदर संघर्ष समिती आणि सरकार यांच्यात तीव्र संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने नेमलेल्या दोन कंपन्यांना बंदराच्या सर्व्हेचे काम सुरळीत पार पाडता यावे म्हणून संरक्षण देण्यासाठी डहाणू उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयात संघर्ष समिती समवेत बैठक बोलावली होती. तिला डहाणू उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर , तहसीलदार प्रतीलता कौरथी माने , वाणगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, बंदर अधिकारी जाधव, चिंचणी मंडळ निरीक्षक राठोड , वाढवण बंदर संघर्ष समितीचे नारायण पाटील , अशोक अंभिरे , वैभव वझे , बारी, हरेश्वर पाटील, अशोक पाटील , कृपानंद पाटील, संतोष राउत ,तानाजी वगैरे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी बोलतांना प्रशाली दिघावकर यांनी वाढवण बंदराच्या सर्व्हेसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना समितीने सहकार्य करण्याचे आवाहन केले.सर्व्हे पूर्ण झाल्या शिवाय बंदर उभारणीचे खरे चित्र स्पष्ट होणार नसल्याचे सांगितले. याच कामावर विकास आराखडा अवलंबून असून तो तयार झाल्यानंतर वाढवण येथे बंदर उभारणे शक्य आहे की नाही हे पर्यावरण विषयक आणि कायदेशीर बाबी पडताळून पाहिल्या नंतरच ठरविले जाणार आहे . त्यामुळे बंदर समितीने सर्व्हेच्या कामात अडथला आणून कायदा हातात घेऊ नये असे त्यांनी आवाहन केले. या वर समितीने आपले म्हणणे मांडतांना या बंदरामुळे मच्छीमारी आणि शेती कशी उध्वस्त होणार आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.बंदी कशी उठविणार?च्१९९८ मध्ये याच ठिकाणी होऊ घातलेले बंदर केंद्र सरकारच्या २० जून १९९१च्या अधीसूचनेमध्ये पर्यावरणीय दृष्ट्या हरित पट्यात आणि उद्योग बंदी क्षेत्रात येत आहे. च्डहाणूच्या विकास आराखड्यात हे भाग येत नसल्याने तसेच सी.आर.झेड.१ (१) या पर्यावरणीय दृष्ट्या अतीसंवेदनशील भागात येत असल्याने त्यावेळी या सर्व कायद्यांचा विचार करून डहाणूच्या पर्यावरण संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने नेमलेल्या डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकारणाने वाढवण बंदर रद्द करण्याचे आदेश दिले होते. च्आता ही तत्कालीन कायदे आणि आदेश कायम असताना सरकारच या आदेशाची पायमल्ली करून अवमान करीत असल्याचे संघर्ष समितीने सष्ट करून आता होणाऱ्या सर्व्हेचे काम शांततेच्या मार्गाने आंदोलन करून होऊ देणार नसल्याचे सांगून आपली भूमिका स्पष्ट केली.