हितेन नाईक। लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : तालुक्यातील खामलोली ग्रामपंचतीच्या सरपंचासह अन्य सहा सदस्यांनी आपला निवडणूक खर्च ३० दिवसाच्या मुदतीत सादर न केल्याचा ठपका ठेऊन त्यांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरविण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी देशमुख ह्यांनी दिल्याने हि ग्रामपंचायत बरखास्त होणार आहे.खामलोली ग्रामपंचायतीत दिनेश डगला, सुभाष घरत, साईनाथ डगला, काजल नाईक, विनता डगला, संगीता पाटील, सरिता गम्भिल हे शिवसेना आणि मनसे सदस्य निवडून आले होते. मात्र निवडणूकीचा निकाल लागल्या नंतर ३० दिवसांच्या आत निवडणुकीच्या खर्चाचे विवरण पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले नसल्याची तक्रार खामलोली येथील सुरेश गजानन पाटील आणि संदीप कृष्णा नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती. या प्रकरणी सरपंचासह अन्य सहा सदस्यांना नोटीस बजावली होती.ह्या प्रकरणाची सुनावणी अप्पर जिल्हाधिकारी सतिष देशमुख ह्यांच्या दालनात झाली असता सरपंच दिनेश डगला, विनता डगला व सरिता गिम्भल यांनी खर्चाचे विवरण सादर केल्याचा खुलासा केला होता. यावेळी १ ते ५ क्रमांकाच्या सदस्यांनी आपली प्रतिज्ञा पत्रे सादर केली असली तरी त्यावर त्यांची सही नसून ते कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या समोर नोंदवले गेले नव्हते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळे मध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब देण्यास कसूर केल्याचा ठपका ठेवीत सर्व सातही सदस्यांना पुढील पाच वर्षा पर्यंत निवडणूक लढण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले.
सहा ग्रा.पं. सदस्य अपात्र
By admin | Published: June 21, 2017 4:17 AM