विरार : विरार पूर्वकडील शबाना मंजिल या इमारतीमधील रूम नंबर ८ मधील राशिद कासार यांच्या हॉलचे छत कोसळून अलिजा कासार या दोन वर्षांच्या मुलीचा अंत झाला. ही घटना शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास घडली.रशीद कासार गेल्या तीन वर्षापासून शबाना मंजिल या इमारतीत राहत आहेत. रशीद एका सलूनमध्ये काम करतात. पहाटे सहाच्या सुमारास अचानक मोठा आवाज आला. आवाजाने त्यांची झोप उडाली. पाहतात तर त्यांच्या शेजारी झोपलेल्या अलीजाच्या डोक्यात छताचा स्लॅब कोसळला होता. तिच्या डोक्याला जबर मार लागला. रशीदने तिला लागलीच शेजारील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.शबाना मंजिल इमारत २३ वर्षे जुनी इमारत आहे. या इमारतीत एकूण ३० कुटुंबे राहतात. इमारत जुनी झाली असून इमारतीला ठीक ठिकाणी तडे गेले आहेत. येथे राहणाऱ्या लोकांचा जीव धोक्यात आहे. या इमारतीचे आज तयागत कोणतेही स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आलेले नाही. इमारत अतिशय धोकादाक अवस्थेत असून पुन्हा अशीच दुर्घटना घडण्याच्या भितीने लोकांना ग्रासले आहे. (वार्ताहर)
स्लॅब कोसळून दोन वर्षांची मुलगी ठार
By admin | Published: October 09, 2016 2:43 AM