वसई : वसई : कसलीच अपेक्षा केली नाही परंतु लोकांनी भरभरून प्रेम दिले. आमच्या कार्याने प्रेरित होऊन अनेक जण समाजकार्यासाठी पुढे आले हीच समाधानाची बाब आहे, असे मत प्रसिध्द समाजसेवक प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. विरारच्या विवा महाविद्यालयात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना चांगला माणूस माणुसकीने जगण्याचा सल्ला दुर्गम भागात, अत्यंत प्रतिकुल परिस्थिती लोकांची विविध प्रकारे सेवा करणाऱ्या प्रकाश आमटे यांच्या जीनवपटाने विरारमधील विद्यार्थी भारावून गेले.
विवा अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे विवा टॉकशो या कार्यक्र माअंतर्गत प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांच्या व्रतस्थ सेवाभावी जीवनाशी विद्यार्थ्यांना परिचय घडवणारा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. त्यांनी बाबा आमटे यांच्या जीवनकार्याने प्रभावित होऊन स्वयंपुर्तीने समाजसेवेचा घेतलेला निर्णयÞ, पत्नीची मिळालेली साथ, दुर्गम भागातील खडतर जीवन, आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात, समाजकार्यात आलेली तिसरी पिढी आदी पैलू उलगडवून दाखवले. ते ऐकताना महाविद्यालयातील विद्यार्थी भारावून गेले गेले होते. आम्ही कुठल्याच अपेक्षेने समाजसेवा केली नाही, परंतु समाजाने भरभरून प्रेम दिले. अशा शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.देव माहित नाही, पुनर्जन्मावर विश्वास नाही. पंरतु असेच काम पुन्हा करायला आवडेल असे मंदाताई आमटे म्हणाल्या. चांगले माणूस बना आणि माणुसकीने जगा असे आवाहन त्यांनी केले. प्रवीण राऊत यांनी महाविद्यालयातर्फे आमटे दांपत्यांशी संवाद साधत त्यांना देवदूत ही उपमा बहाल केली.आपण कसे महासत्ता बनणार?ज्या भागात काम करतो, तेथे लोकांना कपडे नाहीत. म्हणून ४० वर्षापूर्वीच कपडे सोडले, आणि तरी थंडीचा त्रास झाला नाही. सर्वांना दुर्गम भागात जाणे शक्य नाही, परंतु त्यांच्यासाठी, समाजातील वंचित घटकांसाठी आपण अनेक मार्गाने काहीना काही करू शकतो असे ते म्हणाले. देशात ३५ टक्के दारिद्रय आहे. अशावेळी आपण कसे महास्तता बनणार असा सवाल त्यांनी केला.