वाडा : वारंवार खंडित होणाऱ्या विद्युतपुरवठ्यामुळे मलवाडा येथील स्वजन विद्यामंदिर या वसतिगृहात राहणाऱ्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना अनेक रात्री अंधारात काढाव्या लागत होत्या. या विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन मुंबई येथील एचडीएफसी बँक व सीएचआर अॅक्टिव्हिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वसतिगृह व संपूर्ण माध्यमिक शाळेसाठी सौरऊर्जा उपलब्ध करून दिली आहे.सौरऊर्जेवर बसविण्यात आलेल्या एकूण ३६ सौरदिव्यांचे (ट्यूब लाइट्स) उद्घाटन एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी व संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मलवाडा या खेडेगावात स्वजन विद्यामंदिर ही माध्यमिक शाळा असून या शाळेत पाचवी ते दहावीपर्यंत चारशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये २०० विद्यार्थी याच शाळेच्या वसतिगृहात राहत आहेत. या ठिकाणी वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांची विजेअभावी फारच कुचंबणा होत होती. (वार्ताहर)
सौरऊर्जेने वसतिगृह लखलखले
By admin | Published: July 10, 2015 10:28 PM