- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : चिकू महोत्सवात स्थानिकांना स्टॉल न मिळाल्याचा मुद्दा शनिवारी प्रजासत्ताकदिनी झालेल्या बोर्डी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गाजला. दरम्यान वंचित १६ स्थानिक अर्जदार आणि महोत्सव आयोजकांशी सोमवार २८ जानेवारी रोजी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीकडून देण्यात आले.चिकू महोत्सवात आर्थिक घटकांकरिता माफक दरात स्टॉल उपलब्ध करून देणार असल्याचे महोत्सव आयोजकांकडून कळवण्यात आल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. मात्र १६ ग्रामस्थांनी या चिकू महोत्सवाच्या स्टॉलची भाववाढ हा प्रारंभीपासून वादाचा मुद्दा केला होता. त्यामुळे हे भाडे परवडणारे नाही. तथापि या नियोजित क्षेत्राबाहेर ग्रामपंचायतीच्या जागेत स्टॉल लावण्याची मागणीकरिता या गावातील वारली चित्रकार, चिकू प्रक्रिया उद्योजिका, शेतकरी आदी सोळा अर्जदारांनी ग्रामपंचायततिकडे केली होती. प्रजासत्ताक दिनी आयोजित उपसरपंच दिनेश ठाकोर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेत या मुद्यावर चर्चा झाली. यावेळी महोत्सवाच्या क्षेत्राबाहेर स्टॉलकरिता जागा देण्याचा मार्ग काढण्यात आला. परंतु नियोजन, नियम आणि सुरक्षितता हे मुद्दे उपस्थित करून काही ग्रामस्थांनी त्याला विरोध केला. त्यामुळे हा मुद्दा आणखीच चिघळला. यावेळी महोत्सवाचे कोणीही प्रतिनिधी सभेस उपलब्ध नसल्याने त्यांच्याशी अध्यक्षांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला.आयोजकांनी माफक दरात पाच स्टॉल देण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र उर्वरित वंचित राहून त्यांच्यावर अन्याय होईल असे म्हणत ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. त्यामुळे सुमारे पावणेदोन तास चाललेल्या चर्चत निर्णय न होता वादंग वाढत होता. अखेरीस सोमवारी साडेदहाच्या सुमारास अर्जदार, महोत्सव आयोजक यांच्यात समन्वयाची भूमिका ग्रामपंचायत घेईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल अशी माहिती अध्यक्षांनी सभेला देली. त्यामुळे सोमवारच्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रायव्हेट संस्थेची स्थापना करून यंदा चिकू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये गावातील सर्व जाती-जमातीच्या लोकांना प्रतिनिधित्व देण्यात आले नाही. त्यामुळे स्थानिकांचा विचार नाही.-विनीत राऊत, स्थानिककोणत्याही परिस्थितीत स्थानिकांना स्टॉल मिळालाच पाहिजे, अन्यथा आमच्यावर अन्याय होईल, पंचायतीने कोंडी फोडली पाहिजेच.-अभिजित राऊत, स्थानिक अर्जदारमहोत्सवाबाहेर स्टॉल नको, तसे झाल्यास आमचा विरोध राहील.- प्रतीक चुरी, स्थानिक युवकया बाबत सोमवारी आयोजक, अर्जदार आणि ग्रामपंचायत यांची चर्चा आयोजित केली आहे. तोडगा निघणे अपेक्षित आहे.-दिनेश ठाकोरउपसरपंच,बोर्डी ग्रामपंचायत
चिकू महोत्सवातील स्टॉलसाठी खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:37 AM